क्रीडानैपुण्य-शारीरिक विकासाबरोबरच शिस्तप्रिय आदर्श विद्यार्थी तितकाच महत्वाचा - मीना शेंडकर
schedule01 Dec 24 person by visibility 98 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केवळ बौद्धिक विकासावर लक्ष केंद्रित न करता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन हेच विद्यार्थी राष्ट्र उभारणीसाठी सक्षम बनविण्याचे महान कार्य शिक्षकांनी करायचे आहे,त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आवश्यक ते सहकार्य शिक्षकांना व शाळांना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडेकर यांनी दिले.
शिक्षण विभाग प्राथमिक,जिल्हा परिषद, कोल्हापूर व माण देशी फौन्डेशन,म्हसवड, ता.माण जि.सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आदर्श शाळेतील शिक्षकाना निवासी क्रीडा प्रशिक्षण २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केले होते. या प्रशिक्षणा अंतर्गत सलग पाच दिवस निवासी प्रशिक्षणाअंतर्गत शिक्षकांना कबड्डी, खोखो, पोषणमूल्ययुक्त आहार, अॅथलेटिक्स ट्रॅक आणि फील्ड,पोक्सो कायदा, सामाजिक जाणीव व खेळातून विकास यासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले.
शिक्षण विस्तार अधिकारी आर.व्ही.कांबळे यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी उपशिक्षणाधिकारी एस. के. यादव, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश आंग्रे, रावसाहेब पाटील, भारती सुतार यांचा सत्कार करण्यात आला. प्रशिक्षणार्थी महेश घोटणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशिक्षणार्थी प्रीतम गवंडी यांनी आभार मानले.