विद्यापीठातील अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई हवी - युवा सेनेची मागणी
schedule08 Jul 24 person by visibility 310 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : क्रीडा विभागातील बनावट प्रमाणपत्रे, निकृष्ट दर्जाचे बांधकाम ताजे असतानाच विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाची बनावट पदवी काढून त्याचा चीनमध्ये वापर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे कामकाजाचा बट्टयाबोळ उडत आहे अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेतर्फे करण्यात आली आहे. याप्रसंगी कुलसचिव व्ही एन शिंदे यांनी वकरच यावर चौकशी समिती नेमून गुन्हे दाखल करू असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने,चैतन्य देशपांडे, बंडा लोंढे, अक्षय घाटगे, प्रथमेश देशिंगे, उपशहर प्रमुख कीर्ती जाधव, अभिषेक दाबाडे, वैभव पाटील, ओंकार रनवरे आदींचा सहभाग होता.