Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सचिनच्या प्रचारार्थ आबाजींचा झंझावात! मतदारांत विश्वास…कार्यकर्त्यांत उत्साह ! !दालन प्रदर्शन पाहण्यास गर्दी उसळली…प्रार्थना बेहरेंनी साधला संवाददि न्यू एज्युकेशन सोसायटीचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरायाज्ञसेनी पाटील यांच्यासह भाजपच्या उमेदवारांना विजयी करुन अशोक पाटील कुटुंबींयांना न्याय द्या : खासदार धनंजय महाडिकमाहिती विभागाचे छायाचित्रकार अनिल यमकरांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सतेज पाटील समर्थक प्रदीप झांबरेंचा भाजपमध्ये प्रवेश ! मुडशिंगीत काँग्रेसला धक्का !!सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री महापालिकेसाठी महायुतीचा पद वाटपाचा फॉर्म्युला ठरला ! रविवारी अधिकृत घोषणा !!युवक - युवतींसाठी काम, महिला सक्षमीकरणाला प्राधान्य : शिवसेनेचे उमेदवार सचिन पाटीलशिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी भली मोठी रांग ! कुलगुरू. आजी-माजी प्रकुलगुरु, अधिष्ठातांचा समावेश ! !

जाहिरात

 

सचिनच्या प्रचारार्थ आबाजींचा झंझावात! मतदारांत विश्वास…कार्यकर्त्यांत उत्साह ! !

schedule01 Feb 26 person by visibility 18 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शेतकरी आणि दूध उत्पादक हे त्यांच्या केंद्रस्थानी. विविध संस्थेत काम करताना या दोन्ही घटकांना न्याय मिळेल या पद्धतीने त्यांनी कामकाज केले. स्थानिक स्वराज्य संस्था असो की कारखानदारी, दूध संघात चेअरमनपदावर असो की संचालकप्रत्येक ठिकाणी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील तथा आबाजी यांनी सामान्य माणूस डोळयासमोर ठेवून काम केलेआपसूकच लोकांचा त्यांच्यावरील विश्वास वृद्धिगंत झाला. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ ते गावोगावी दौरे करत आहेत. प्रत्येक गावात त्यांच्याभोवती नागरिकांचा गराडा पडत आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सचिन पाटील यांना विजयी करण्याची खात्री देत आहेत. त्यांचाा प्रचाराचा झंझावात कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित करत आहेत. तर प्रचार फेरीदरम्यान मतदार त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यकत करत आहेत.

गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यंदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवित आहेत. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ते लढत आहेत. शिरोली दुमालाचे लोकनियुक्त सरपंच म्हणून सचिन पाटील यांनी नेतृत्वगुण सिद्ध केले आहे. तरुण चेहरा म्हणून त्यांना मतदारांनी पसंती दिली आहे. पाडळी खुर्द मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीचे स्वागत होत आहे. हा मतदारसंघ विस्ताराने मोठा. यंदा नव्याने हा गट तयार झाला आहे. साखर कारखाना क्षेत्र, गावपातळीवरील सहकारी संस्था, प्राथमिक दूध संस्थेचे जाळे. पाडळी खुर्द, शिरोली दुमाला, वाशी, वाडीपीर, शेळकेवाडी, नंदवाळ, कोगे, महे, बीड, आरे, धनगरवाडी, सावरवाडी, हिरवडे दुमाला आदी गावे या मतदारसंघात समाविष्ठ आहेत.

या परिसरात गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ते सर्व घटकांतील आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून काम करताना विश्वास पाटील यांनी वडिलधारी माणूस म्हणून जबाबदारी निभावली आहे. कोणताही प्रसंग असो, ते आधारवड म्हणून लोकांच्या पाठीशी राहतात. त्यांनी, वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे. मात्र प्रचारातील त्यांचा उत्साह तरुण कार्यकर्त्यांना लाजविणारा आहे. दिवसभर मतदारसंघातील विविध गावांना ते भेटी देत असतात. लोकांशी संपर्क साधत आहेत. सचिन पाटील यांना विजयी करा असे आवाहन करताना विकासाची भूमिका मांडत आहेत. त्यांचा संपर्क दौरा मतांची बेरीज करणारा ठरत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes