महापालिकेसाठी महायुतीचा पद वाटपाचा फॉर्म्युला ठरला ! रविवारी अधिकृत घोषणा !!
schedule31 Jan 26 person by visibility 91 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेतील पदाधिकारी निवडीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांची शनिवारी (31 जानेवारी) कोल्हापुरात बैठक झाली. या बैठकीत महायुती अंतर्गत महापालिकेतील पद वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ हे मुंबईत असल्यामुळे त्यांना या संदर्भातील सगळी माहिती देण्यात आली. मुश्रीफ हे रविवारी, एक फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात येणार आहेत. रविवारी पुन्हा एकदा महायुतीच्या नेते मंडळींची बैठक होणार आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या पद वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची बैठक झाली. यामध्ये महापालिकेतील पदाधिकारी निवडी व पद वाटप यासंबंधी चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी मंत्री पाटील, खासदार महाडिक, आमदार महाडिक व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश शिरसागर यांच्यासोबत एक बैठक झाली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महापालिकेतील सत्ता वाटपाच्या फार्मुलाबद्दल चर्चा करण्यात आली. भाजपला कोणती पदे, शिवसेनेला कोणती पदे आणि राष्ट्रवादीला कोणती पदे यासबधी चर्चा झाली. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ हे सध्या मुंबईत आहेत. त्यामुळे त्यांना या बैठकीतील चर्चेची सगळी माहिती देण्यात आली. मंत्री मुश्रीफ हे रविवारी कोल्हापुरात येणार आहेत. मंत्री मुश्रीफ कोल्हापुरात आल्यानंतर पुन्हा एकदा महायुतीच्या नेते मंडळींची बैठक होणार आहे. त्या बैठकीत फार्मुल्यावर शिक्का मोर्तब होईल. त्यानंतर त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपला 26 जागा, शिवसेनेला 15 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला चार जागा मिळाल्या आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाचा एक नगरसेवक निवडून आला आहे. दरम्यान हॉटेल अयोध्या येथे झालेल्या बैठकीवेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम यांनी मंत्री पाटील यांची भेट घेतली.