Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सीईओच ताराराणी महोत्सवाला भेट, बचत गटाकडून वस्तूंची  खरेदीगोकुळतर्फे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण, शेतकऱ्यांना होणार थेट लाभजिपचे पदाधिकारी, पंचायत समिती सभापतीसाठी नवीन वाहन, अंदाजपत्रकात चार कोटीची तरतूदजुनी पेन्शनसाठी शुक्रवारपासून आंदोलन, शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जिप अध्यक्ष- उपाध्यक्षपदी शिल्पा खोत, तानाजी पाटील बिनविरोध! काँग्रेसची माघार!!माजी विद्यार्थ्याने मिळवले यूपीएससीत यश, शाळेने केले मिरवणुकीद्वारे जल्लोषी स्वागतजिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेस लढविणार, अर्ज दाखलजरगनगर विद्यामंदिर बनली हायटेक शाळा, अत्याधुनिक लॅबची राज्यात महापालिकेची पहिलीच शाळाजिप अध्यक्ष - उपाध्यक्षांची नावे निश्चित ! शिल्पा खोत, तानाजी पाटलांना संधी! जिप सदस्य अरुण जाधव यांच्या विरोधात जिल्हा कोर्टात याचिका

जाहिरात

 

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

schedule31 Jan 26 person by visibility 644 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : खासदार सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर खासदार सुनेत्रा पवार यांची राज्य मंत्रिमंडळात निवड करण्यात आली. सुनेत्रा पवार यांनी शनिवारी 31 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी मंत्रीपदाची व गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत  यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शपथविधी पार पडला.  याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील,  हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, माजी मंत्री नवाब मलिक आदी उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची दुपारी बैठक झाली या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली सायंकाळी पाच वाजता त्यांनी  उपमुख्यमंत्री पदाचा शपथ घेतली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रीपदी महिलेची निवड झाली. सुनेत्रा पवार या मंत्रीपदाची शपथ घ्यायला गेल्यानंतर उपस्थितांमधून "अमर रहे अमर रहे, अजितदादा अमर रहे, महाराष्ट्राचा एकच दादा अजितदादा अजितदादा " अशा घोषणा देण्यात आल्या. दहा मिनिटात हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes