युवक - युवतींसाठी काम, महिला सक्षमीकरणाला प्राधान्य : शिवसेनेचे उमेदवार सचिन पाटील
schedule31 Jan 26 person by visibility 24 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सचिन विश्वास पाटील यांच्या प्रचारफेरीला मतदारांकडून् उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रचार फेरी दरम्यान उमेदवार सचिन पाटील यांनी, ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून मतदारसंघातील विकासकामांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करू. गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील लोकांसाठी काम करत आहे. मतदारसंघातील महिला सक्षमीकरणाला प्राधान्य आणि युवक युवक – युवतींच्या रोजगार निर्मितीसाठी काम करणार आहे.’अशी ग्वाही त्यांनी मतदारांना दिली.
पाडळी खुर्दं जिल्हा परिषद मतदारसंघ हा नव्यानेच निर्माण झाला आहे. या मतदारसंघात तेरा गावांचा समावेश आहे. मतदारसंख्या ३५ हजाराच्या आसपास आहे. या मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची म्हणून सचिन पाटील हे अगोदरपासून तयारी करत होते. काम करण्याची क्षमता, जनसंपर्क, सरपंचपदाचा अनुभव हे सारे विचारात घेऊन शिवसेनेने त्यांना या मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. आमदार नरके, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यंत्रणा गतीमान झाली आहे. उमेदवार सचिन पाटील हे मतदारसंघातील प्रत्येक गावांना भेटी दिल्या आहेत. लोकांशी संपर्क केला आहे. वैयक्तिक गाठीभेट घेत आहेत.त्यांच्या प्रचाराला प्रतिसाद मिळत आहे.
या प्रचारफेरीत ते मतदारांना विकासकामावरुन आश्वस्त करत आहेत. महिला सक्षमीकरणाला प्राधान्य राहील याची ग्वाही देत आहेत. सरकारी योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. युवक व युवतीना रोजगार, विविध सरकारी योजनेद्वारे त्यांचा आर्थिक विकास करण्यावर भर राहील. असा विश्वास ते मतदारांना देत आहेत. मतदारसंघातील मतदारांचा संपर्क पाहता मी चांगल्या मतांनी निवडून येणार याची खात्री पटत आहे असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन पाटील हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवित आहेत.