Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सीईओच ताराराणी महोत्सवाला भेट, बचत गटाकडून वस्तूंची  खरेदीगोकुळतर्फे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण, शेतकऱ्यांना होणार थेट लाभजिपचे पदाधिकारी, पंचायत समिती सभापतीसाठी नवीन वाहन, अंदाजपत्रकात चार कोटीची तरतूदजुनी पेन्शनसाठी शुक्रवारपासून आंदोलन, शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जिप अध्यक्ष- उपाध्यक्षपदी शिल्पा खोत, तानाजी पाटील बिनविरोध! काँग्रेसची माघार!!माजी विद्यार्थ्याने मिळवले यूपीएससीत यश, शाळेने केले मिरवणुकीद्वारे जल्लोषी स्वागतजिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेस लढविणार, अर्ज दाखलजरगनगर विद्यामंदिर बनली हायटेक शाळा, अत्याधुनिक लॅबची राज्यात महापालिकेची पहिलीच शाळाजिप अध्यक्ष - उपाध्यक्षांची नावे निश्चित ! शिल्पा खोत, तानाजी पाटलांना संधी! जिप सदस्य अरुण जाधव यांच्या विरोधात जिल्हा कोर्टात याचिका

जाहिरात

 

माहिती विभागाचे छायाचित्रकार अनिल यमकरांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार 

schedule31 Jan 26 person by visibility 190 categoryलाइफस्टाइल

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे छायाचित्रकार अनिल मालोजी यमकर हे ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शनिवारी,  (३१ जानेवारी २०२६) निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कोल्हापूर येथील माहिती विभागाच्या दोन्ही कार्यालय व  जिल्ह्यातील माध्यम क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी अमोल येडगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त उपसंचालक वसंत शिर्के, सध्याचे उपसंचालक प्रवीण टाके, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, सांगली जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष समीर देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छायाचित्रकार यमकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.  यमकर यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कारकिर्दीवर बनवलेली चित्रफीत विशेष उल्लेखनीय ठरली. यावेळी मान्यवरांनी यमकर यांनी गेल्या ३५ वर्षात माहिती विभागाच्यावतीने केलेल्या जनसंपर्काचे कौतुक केल  जिल्हाधिकारी येडगे यांनी त्यांच्या वक्तशीरपणाचे व सातत्याचे यावेळी कौतुक केले. माहिती विभागाचे स्थानिक संपर्क अधिकारी म्हणून त्यांची विशेष ओळख होती असा गौरवोल्लेख मान्यवरांनी केला.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर,विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रताप नाईक, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले, माहिती अधिकारी एकनाथ पोवार, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदीवाडेकर, शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे माजी विभाग प्रमुख रत्नाकर पंडित, निवृत्त माहिती अधिकारी सखाराम माने, दिलीप घाटगे यांनी उपस्थित राहून सदिच्छा व्यक्त केल्या. माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपसंपादक रणजीत पवार यांनी आभार मानले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes