शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात ‘फ्रीडम सिलेक्शन ऑफर’, १५ ऑगस्ट २०२० पूर्वी प्रवेश निश्चित करणाऱ्या विद्यार्थिनींना स्मार्टफोन किंवा टॅब जिंकण्याची संधी
schedule02 Aug 20 person by visibility 986 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते. विद्यार्थी केंद्रीभूत उपक्रम राबविण्यावर महाविद्यालयाचा भर असतो. उत्तम शिक्षण आणि १०० टक्के नोकरीची हमी देणारे हे महाविद्यालय म्हणजे विद्यार्थिनीसाठी एक पर्वणीच असल्याचा दावा व्यवस्थापन करते. सध्या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाविद्यालयाने ‘फ्रीडम सिलेक्शन ऑफर’ जाहीर केली आहे. विशेष बाब म्हणजे, १५ ऑगस्ट २०२० पूर्वी प्रवेश निश्चित करणाऱ्या विद्यार्थिनींना स्मार्टफोन किंवा टॅब जिंकण्याची सुवर्णसंधी महाविद्यालयामार्फत देण्यात येत आहे. जेणेकरुन भविष्यातील ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था आपोआप होईल.
‘विद्यार्थिनींनी आजच प्रवेश निश्चित करावा. विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थिनीकडून विचारणा होत आहे. प्रवेश क्षमता पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे आम्हाला आपणास प्रवेश देता येणार नाही.’असे महाविद्यालयाने म्हटले आहे. गेल्या दोन वर्षात महाविद्यालयाने वेगवेगळे उपक्रम राबविले. खास मुलींसाठी असलेल्या या महाविद्यालयाने मुलींच्या सर्वांगिण विकासाचा वसा घेतला आहे.
महाविद्यालयात बॅचलर ऑफ कम्युटर,बॅचलर ऑफ आर्टस इन मास मिडिया,बीएस्सी इन इनफॉरमेशन टेक्नॉलॉजी, बीएस्सी, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन हे अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा आहे. प्रवेशासंदर्भात https://forms.gle/AHL3BcoXnMNnkg8F6 या लिंकवर माहिती कळवावी असे महाविद्यालयाने म्हटले आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी प्राचार्य प्रशांत पालकर (७२१८१८००६६), प्रा. संतोष चौगुले (९९७०८१७८८१)यांच्याशी संपर्क साधावा. सध्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वच शिक्षण संस्थांनी ऑनलाइन शिक्षणावर भर दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाने जाहीर केलेली ‘फ्रीडम सिलेक्शन ऑफर’ही ऑनलाइन शिक्षणासंदर्भात उपयुक्त ठरणारआहे. १५ ऑगस्टपूर्वी प्रवेश निश्चित केल्यास विद्यार्थिनींना स्मार्टफोन किंवा टॅब जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्याचा ऑनलाइन शिक्षणासाठी फायदा होवू शकतो…………