Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक मतदार संघातील उमेदवार प्रफुल्ल तारेंचा प्रा.जयंत आसगावकरांना पाठिंबाकेडीसीसी बँकेसाठी आता काय करायला पाहिजे हे मुश्रीफांनी ठरवावे- सतेज पाटलांचा मर्मभेदी टोलानातवाच्या निवडणुकीसाठी आजोबांचा प्रचाराचा झंझावातराहुल पाटलांचा विजय…पीएन गटाला बळ !प्रामाणिक कामाला विजयाचे तोरण...!कौस्तुभ गावडेंच्या प्रचारासाठी साताऱ्यात शिक्षक सरसावले ! गृहभेटी वैयक्तिक संपर्काद्वारे प्रचारावर भर !!कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात, मिरवणुकीतून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन आमदार म्हणून शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी प्रामाणिकपणाने लढा दिला -: प्रा. जयंत आसगावकरतततइतिहास घडणार, शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे सर्वात तरुण आमदार ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

शिक्षक मतदार संघातील उमेदवार प्रफुल्ल तारेंचा प्रा.जयंत आसगावकरांना पाठिंबा

schedule21 Oct 26 person by visibility 91 categoryशैक्षणिक

 महाराष्ट्र न्यूज वन  प्रतिनिधी : पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातील बारामती येथील उमेदवार प्रफुल्ल तारे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक जयंत तासगावकर यांना जाहीर पाठिंबा दिला. आमदार काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अजिंक्यतारा कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तारे यांनी पाठिंबा देत असल्याची जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्या आव्हानाला प्रतिसाद दे त आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी आमदार सतेज पाटील यांनी तारे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे आभार मानले. तसेच त्यांची व महाविकास आघाडीची वैचारिक भूमिका एक असल्यामुळे आम्ही सगळे एकत्रितपणे काम करणार आहोत. त्यांच्या पाठिंबामुळे काँग्रेसचे उमेदवार आजगावकर यांना बळ मिळाले असेही आमदार पाटील यांनी म्हटले. तर आमदार जयंत आसगावकर यांनी, ' शिक्षण क्षेत्रासमोरील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तारे आणि जी भूमिका घेतली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे शिक्षक मतदार संघातील त्यांच्या पाठिंबामुळे निवडणुकीत निश्चितच फायदा होईल त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच विविध प्रश्न मार्गी लावू.' या पत्रकार परिषदेवेळी बांधकाम व्यवसायिक राजीव परीख, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes