Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राहुल पाटलांचा विजय…पीएन गटाला बळ !प्रामाणिक कामाला विजयाचे तोरण...!कौस्तुभ गावडेंच्या प्रचारासाठी साताऱ्यात शिक्षक सरसावले ! गृहभेटी वैयक्तिक संपर्काद्वारे प्रचारावर भर !!कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात, मिरवणुकीतून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन आमदार म्हणून शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी प्रामाणिकपणाने लढा दिला -: प्रा. जयंत आसगावकरतततइतिहास घडणार, शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे सर्वात तरुण आमदार ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमोठ-मोठे गार झाले गोकुळमध्ये, सतेज पाटलांनी जिंकली निवडणूक ! महायुतीच्या बडया नेत्यांसह वारसदारांनाही झटका !!गोकुळमध्ये शिट्टी वाजली, सतेज पाटील सत्तेच्या दिशेने ! महायुतीला झटका!!तिसऱ्या फेरीअखेर महायुतीचे 14 उमेदवार आघाडीवर, समविचारीचे सहा उमेदवारांची मुसंडी

जाहिरात

 

प्रामाणिक कामाला विजयाचे तोरण...!

schedule21 Oct 26 person by visibility 59 categoryउद्योग

महाराष्ट् न्यूज वन प्रतिनिधी -: संचालक म्हणून पाच वर्षे त्यांनी प्रामाणिकपणाने काम केले. दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत विविध योजना पोहोचविण्याला प्राधान्य दिले. महायुतीतून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यांनी इतर उमेदवारांसोबत प्रचारही सुरू केला. पण तालुक्यातील राजकीय घडामोडीतून ऐनवेळी महायुतीतून त्यांची उमेदवार कापली गेली. मात्र दूध उत्पादक ठरावधारक, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांसह त्यांनी ठरविलं की, ‘प्रामाणिकपणाने आपण काम करतोय, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक प्रक्रियेतूनबाहेर पडायचं नाही. त्यांनी काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीत प्रवेश केला. उमेदवारीही मिळाली…आणि निवडणुकीत विजयही मिळवला…ही कहाणी आहे, प्रा. किसन बापूसो चौगले यांची. गोकुळ निवडणुकीत २८५२ मते घेत ते विजयी ठरले आहेत.

राधानगरी तालुक्यातील एक हजार लोकवस्तीचे चाफोडी हे त्यांचे गाव. फार मोठी  राजकीय पार्श्वभूमी नसतान त्यांनी ओळख निर्माण केली. त्यांचा गोकुळमधील विजय हा सहकार, राजकीय क्षेत्रात काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांची उमेद वाढविणारा हा विजय ठरला. प्रा. चौगले हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत. माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांच्यासोबत सक्रिय. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी. भोगावती कारखान्यात संचालक होते. तालुका राष्ट्रवादी अध्यक्षपदी काम केले होते.

 पुढे राष्ट्रवादीतही फूट पडली. नेतेही विभागले.  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांच्यासोबत राजकीय मतभेद झाले आणि त्यांनी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. गोकुळमध्ये प्रा. किसन चौगले यांना उमेदवारी देणार हा शब्द मंत्री मुश्रीफ यांनी कागल येथील गेस्ट हाऊसमध्ये साऱ्यांच्यासोबत दिला होता. त्यानुसार चौगले यांनी प्रचाराला सुरुवात केली. गोकुळची धामधूम वाढत गेली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए.वाय. पाटील यांची महायुतीच्या आघाडीत प्रवेश झाला. मात्र ए. वाय. यांच्या आघाडीतील प्रवेशाने तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. ’सासूसाठी वाटणी करावी आणि सासूच वाटणीला यावी.’अशी गत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची झाली.

पुढे तालुक्यातील जागा वाटप, राजकारणातून प्रा. चौगले यांच्या उमेदवारीला कात्री लागली. हा साऱ्यांसाठी धक्का होता.प्रा. चौगले यांच्यासह बिद्री कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे, राजेंद्र पाटील सरवडेकर, उमेश भोईटे, दिपक किल्लेदार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनय पाटील, बिद्रीचे माजी संचालक भिकाजी एकल, विष्णुपंत शेळके, विश्वास पाटील तारळेकर, बाजीराव पाटील मोहडे यांनी काँग्रेसचे नेते आमदार पाटील यांच्या समविचारी आघाडीत प्रवेश केला.उमेदवारीही मिळाली….गोकुळच्या निवडणुकीत समविचारी आघाडीकडून प्रा. चौगले विजयीही झाले.

……………

“ पाच वर्षात गोकुळ दूध संघात प्रामाणिकपणे काम केले होते. दूध उत्पादकांनी विश्वास दाखविला. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दूध उत्पादक, शेतकऱ्यांसाठी भरीव काम करू. आमदार पाटील यांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्याची पूर्तता करण्याला प्राधान्य राहील.’

प्रा. किसन चौगले, संचालक गोकुळ

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes