Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ले पदभ्रमंतीडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दहा पुरस्कारकरवीर गर्जनातर्फे गुढीपाडव्यादिवशी शोभायात्राकाँग्रेसने थाटली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल, गॅस दरवाढ –तुटवडावरोधात आंदोलनकोल्हापूर भाजपतर्फे राहुल गांधीच्या निषेधार्थ शिवाजी चौकात निदर्शने  किडनीच्या आरोग्यासाठी समतोल आहार-नियमित व्यायामाची गरज - डॉ विश्वनाथ मगदूम  महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित, अध्यक्ष-उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी !  पाच वर्षात ४ अध्यक्ष-उपाध्यक्ष, २० सभापती ! !गोकुळच्या कार्यक्रमात सतेज पाटलांची राजकीय टोलेबाजी, मुश्रीफ-नरकेंच्या उपस्थितीत महाडिकांना डिवचले ! आबिटकर, कोरे कार्यक्रमाला अनुपस्थित ! !डिबेंचर्सच्या रकमेबाबत दूध संस्थांना अपेक्षित निर्णय होईल – हसन मुश्रीफकलाकार आहेत म्हणून समाज आहे- प्रकुलगुरू ज्योती जाधव

जाहिरात

 

काँग्रेसने थाटली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल, गॅस दरवाढ –तुटवडावरोधात आंदोलन

schedule16 Mar 26 person by visibility 10 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गॅस दरवाढ आणि तुटवडा यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या होणाऱ्या त्रासाकडे प्रशासन व सरकारचे  लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर शहर काँग्रेसतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले.काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर चक्क चूल थाटत भाकरी केल्या. महायुती सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची भेट घेऊन त्यांना निवेदनासह चुलवर केलेल्या भाकरी दिल्या. ‘सर्वसामान्य जनता, छोटे व्यावसायिक आणि हॉटेल चालकांना गॅस सिलिंडर विना अडथळा सहज उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्याबरोबरच सरकारने वाढवलेल्या गॅसच्या किमती तात्काळ कमी कराव्यात’अशी मागणी केली.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, पदाधिकारी सुर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, सरला पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक अमर समर्थ, प्रवीण सोनवणे, तौफिक मुल्लाणी, संपतराव चव्हाण पाटील, संध्या घोटणे, वैशाली महाडिक, विनायक घोरपडे, संजय पोवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर  निदर्शने केली. महिला कार्यकर्त्यांनी चूल थाटत भाकरी केल्या. गॅस दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. सिलिंडरसाठॅ ९०० रुपयांपेक्षा जास्त मोजावे लागत आहेत. तसेच, सिलिंडर बुकिंगचा कालावधी १५ दिवसांवरून एक महिना करण्यात आल्याने जनतेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीही १९०० रुपयांच्या वर गेल्या असून, त्यांचे रेशनिंग केले जात आहे. याचा थेट फटका विद्यार्थी, कामगार, नोकरदार ज्यांच्या घरच्या जेवणाची सोय नाही अशा लोकांना बसत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes