कुस्ती प्रशिक्षक पी जी पाटील यांचे निधन
schedule19 Dec 24 person by visibility 882 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कुस्तीतील बांगडी डावाने प्रसिद्ध असणारे बांगडी बहाद्दर पैलवान आणि राष्ट्रीय पातळीवरील मल्ल घडविणारे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक पांडुरंग गोविंद तथा पी जी पाटील (वय वर्ष 83) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे
विद्यार्थी दशेतअसताना त्यांनी पतियाळा येथील स्पर्धेत पदक मिळवले होते. ते विद्यापीठ चॅम्पियन होते . त्याावेळी मोतीबाग तालीम येथे सराव करीत होते.
त्यांनी महान भारत केसरी दादू चौगुले ,कुस्ती सम्राट युवराज पाटील हिंदकेसरी संभा मुतनाळ, राष्ट्रकुल पदक विजेते राम सारंग, संभाजी पाटील याआंतरराष्ट्रीय मल्लांसह महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर गुलाब बर्डे ,सरदार कुशल ,विष्णू फडतरे, बाळू पाटील, हिंदकेसरी विनोद चौगुले यांच्यासह आज सराव करणाऱ्या बहुतांशी मल्लांना प्रशिक्षण देऊन घडविले आहे विशेषतः कुस्ती सम्राट युवराज पाटील यांना आखाड्यातील सरावाबरोबरच क्रीडांगणावरही धावणे व इतर ऍथलेटिक्स व जिम्नेशियम करण्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले होते. सदैव क्रीडांगण आणि आखाड्यात असणारे पीजी हे गेल्या दीड वर्षात घरीच होते.
कोल्हापूर जिल्हा परिषद या ठिकाणी लिपिक पदावर काम करीत असताना जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेबरोबर पाटाकडील तालमीचे विद्यमान कार्याध्यक्ष ,कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव व प्रशिक्षक अशा अनेक संघटनात्मक पदावर त्यांनी काम केले. प्रसिद्धीपासून अलिप्त राहून कुस्ती कलेची सेवा करणारे एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले अशा शब्दांत हळहळ व्यक्त होत आहे. रक्षा विसर्जन शुक्रवारी २० डिसेेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे