दर्पण फाऊंडेशनतर्फे किशोरप्रेमींसाठी सांगितिक मैफिल
schedule30 Dec 24 person by visibility 37 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सुमधुर आवाजाने संपूर्ण जगावर मोहिनी घातलेला गायक म्हणजे किशोर कुमार. फक्त गायकच नाही तर निर्माता ,दिग्दर्शक, पटकथा लेखक ,संगीतकार आणि मुख्य म्हणजे अभिनेता अशा कितीतरी पैलूंनी भारलेलं रत्न म्हणजे किशोर कुमार. त्यांच्याच गाण्यांची मेजवानी दर्पण फाउंडेशनतर्फे गुरुवारी ( दोन जानेवारी २०२५ ) मिळणार आहे.
दर्पण फाउंडेशनचे विक्रांत पिसे आणि राम भोळे हे ही खास मेजवानी घेऊन येणार आहेत. गायन समाज देवल क्लब येथ्ील गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, कोल्हापूर येथे सायंकाळी पाच वाजता विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये किशोर कुमार यांच्या आवाजाचा हुबेहूब भास करून निर्माण देणारे गायक प्रा.अनिल कुमार घाटगे,पुणे आणि पुण्याची प्रख्यात गायिका राही शेंडगे हे आपला स्वर साज चढवणार आहेत.
कार्यक्रमात गायिका योगिता पाटील, स्नेहलता सातपुते, कुमार पाटील, निशा देसाई हे आपली गायन कला सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक फैय्याज नरवाडे करणार आहेत. या कार्यक्रमासाठीचे डिझाईन दर्पण फाउंडेशनचे संचालक व नक्षत्र ग्राफिक्स चे श्रीपाद रामदासी यांनी केले आहे. कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन व लाईट संजय नलवडे यांचे कडे आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.