आनंद माने, सागर डेळेकर. सचिन पाटील, संदीप मगदूमसह पाच जणांना पुरस्कार ! चार जानेवारीला पुरस्कार वितरण !!
schedule30 Dec 24 person by visibility 64 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कौलव येथील पी. एन. पाटील फाऊंडेशनतर्फे पी. एन. पाटील स्मृती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले. चार जानेवारी २०२५ रोजी कौलव येथील प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणावर पुरस्कार वितरण सोहळा आहे अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली आहे. यंदा, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, शिवाजी विद्यापीठातील संशोधक डॉ. सागर डेळेकर, सचिन विश्वासराव पाटील (शिरोली दुमाला), सामाजिक कार्यकर्ते कृष्णात बुवा (कौलव), शिक्षक-निवेदक संदीप मगदूम यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.