राष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये आर्यवर्त यादवचे यश
schedule30 Dec 24 person by visibility 249 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे पार पडलेल्या ६७ व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या आर्यवर्त धैर्यशील यादवने २१ वर्ष वयोगटामध्ये रायफल स्पर्धेमध्ये ६०३.७ इतके गुणांकन मिळवीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या भारतीय चाचणी स्पर्धेसाठी थेट पात्रता प्राप्त झाली.
भारताच्या चाचणी स्पर्धेसाठी एकूण 3 राष्ट्रीय स्पर्धा खेलाव्या लागतात आणि त्यातून सरासरी गुण काढून त्यामध्ये पात्रता अंतिम करण्यात येते. आर्यवर्तने ६०० पेक्षा अधिक गुणांनी स्पर्धा जिकल्याने चाचणी स्पर्धेसाठी पात्र झाला.
मागील महिन्यामध्ये त्याने बालेवाडी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र चॅम्पियन स्पर्धेत ब्राँझ पदक मिळवले होते. आणि आता वयाच्या अवघ्या तेराव्या अशाप्रकारे थेट स्पर्धेस पात्र होणारा भारतातील सर्वात लहान वयाचा हा खेळाडू असण्याची शक्यता आहे.
सध्या आर्यवर्त आंतरराष्ट्रीय नेमबाज रमेश कूसाळे आणि तेजस कुसाळे यांच्या अधिपत्याखाली जे बी कूसाळे शूटिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. शाहू विद्यालय येथे शालेय शिक्षण घेत आहे. त्याच्या यशामागे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल पाटी, जयंती इंदुलकर, जे बी कुसाले फाऊंडेशनच्या अध्यक्षा कल्पना कूसाले, कोल्हापूर आणि महाराष्ट्र रायफल असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.