Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जज डडशाळांच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी ग्रामपंचायतींना पत्र द्या, पुरोगामी शिक्षक संघटनेचे सीईओंना निवेदनविकासकामांना विलंब खपवून घेणार नाही, आमदार राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोलराष्ट्रीय महिला कलाकार कार्यशाळेचे दिमाखात उद्घाटन, तीन दिवस  विविध कार्यक्रमडॉ. पी. एम. चौगुले लिखित औषधांच्या पलीकडे : एक सायकियाट्रिस्टची यशोगाथा पुस्तकाचे रविवारी प्रकाशनरिक्षा व्यावसायिकांचे सोमवारी रिक्षा बंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेमंत्री -आमदारांच्या निधीच्या अट्टाहासामुळे जिल्हा परिषद सदस्यावर उपोषणाची वेळ, काँग्रेसचा हल्लाबोलकोल्हापुरातील तालमीत साकारणार पैलवान ग्रंथालय, शनिवारी पुस्तक भेट- लोगो अनावरणाचा कार्यक्रम! नव्या निवडीत महापौरपदी मूळ ओबीसींना संधी  ! की दाखले काढणाऱ्यांची चलती ?काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मागणी

जाहिरात

 

विकासकामांना विलंब खपवून घेणार नाही, आमदार राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

schedule20 Nov 26 person by visibility 19 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शहरातील प्रलंबित विकासकामे, नागरिकांचे प्रश्न आणि महानगरपालिका प्रशासनाच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाची बैठक घेतली. या बैठकीत झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड, मनपा गाळेधारकांचे प्रश्न, अनधिकृत बांधकाम, विविध स्मारके, पार्किंग व्यवस्था, क्रीडा सुविधा, उद्याने, जलतरण तलाव, तसेच शहरातील सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विकासकामांना होणारा विलंब आणि अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी कारणे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार क्षीरसागर यांनी दिला.
झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या प्रक्रियेबाबत महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या कामाचे आमदार क्षीरसागर यांनी अभिनंदन केले. प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे झोपडपट्टीधारकांना त्यांच्या मालमत्तेवरील हक्क अधिकृतपणे प्राप्त होऊन त्यांचे राहणीमान उंचावण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, शहरात कोणी दादागिरी करत असेल, तर त्याला उत्तर देण्यास आपण सक्षम असल्याचे सांगत अन्याय सहन केला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अजय इंगवले, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर, उपायुक्त धनवडे, परितोष कंकाळ, नागेंद्र मुतकेकर, सहाय्यक संचालक प्रशांत भोसले, आश्पाक आजरेकर, नेपोलियन सोनुले आदी उपस्थित होते.

गाळेधारकांच्या प्रश्नांवर समन्वयातून तोडगा काढा
महानगरपालिकेच्या गाळेधारकांच्या प्रश्नांबाबत गाळेधारक आणि महानगरपालिका प्रशासन या दोन्ही बाजूंनी समन्वय साधून प्रश्न मार्गी लावावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. निवृत्ती चौक येथील जनता बाजार परिसरातील सध्या बंद असलेल्या हॉस्पिटलच्या जागेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारक उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देत असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.शाहू क्लॉथ मार्केट आणि कोंबडी बाजार या दोन्ही जागांचा एकत्रित विकास करून महापालिकेची इमारत आणि पार्किंग सुविधा उभारता येईल का, याबाबत आयुक्तांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सुचविले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes