Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मंत्री -आमदारांच्या निधीच्या अट्टाहासामुळे जिल्हा परिषद सदस्यावर उपोषणाची वेळ, काँग्रेसचा हल्लाबोलकोल्हापुरातील तालमीत साकारणार पैलवान ग्रंथालय, शनिवारी पुस्तक भेट- लोगो अनावरणाचा कार्यक्रम! नव्या निवडीत महापौरपदी मूळ ओबीसींना संधी  ! की दाखले काढणाऱ्यांची चलती ?काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मागणीआरोग्य, बांधकामचे मुख्य अधिकारी रजेवर ! अन्य अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार!!फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी मेघराज राजेभोसलेगोकुळतर्फे दूध खरेदी -विक्री दरात वाढ, २१ नोव्हेंबरपासून अंमलबजावणीवाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोडसह्याद्रीच्या रक्षणासाठी जागरण यात्रा, पहिल्या टप्प्यात पारगड ते पन्हाळा यात्रा कॅननचे कोल्हापुरात अत्याधुनिक प्रॉडक्शन प्रिंटर्सचे प्रदर्शन

जाहिरात

 

मंत्री -आमदारांच्या निधीच्या अट्टाहासामुळे जिल्हा परिषद सदस्यावर उपोषणाची वेळ, काँग्रेसचा हल्लाबोल

schedule20 Nov 26 person by visibility 48 categoryजिल्हा परिषद

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या विकास कामासाठीच्या निधी वाटपाचे अधिकार जिल्हा परिषद सभागृहाला आहेत. मात्र मंत्री व आमदारांच्या अट्टाहासामुळे जिल्हा परिषद सदस्यांना हक्काच्या निधीला मुकावे लागत आहे. जिल्हा परिषद सदस्यांना मिळणाऱ्या निधीमध्ये दुजाभाव करू नये. सत्ताधारी व विरोधी आघाडीच्या सदस्यांना समान निधी मिळावा यासाठी जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या सदस्यांनी शुक्रवारी 20 नोव्हेंबर 2026 रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. पालकमंत्री व आमदारांनी जिल्हा परिषद सदस्यांच्या भावना विचारात घेऊन सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र केले जाईल. प्रसंगी त्यांच्या कार्यालयात जाऊन ठिय्या मारू असा इशाराही काँग्रेसच्या सदस्यांनी दिला.
 'निधीचे वाटप समसमान झाले पाहिजे, निधी आमच्या हक्काचा - नाही कुणाच्या बापाचा' अशा घोषणा देत सदस्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील रोष व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच हे आंदोलन झाले काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, सदस्य अभिजीत तायशेटे, सागर धुंदरे, सुदर्शन खोत, हामू पाटील, राहुल आवळे, संग्राम पाटील, संदीप कांबळे, रसिका पाटील, सोनाली  सावंत, रश्मी देसाई, सोनाली पाटील, अर्चना चौगुले,  शिवसेना ठाकरे पक्षाचे अमरसिंह पाटील, महेश कुंभार, राहुल सावंत, अमर चौगुले यांचा आंदोलनात सहभाग होता. जिल्हा परिषदेचे सदस्य सागर धुंदरे म्हणाले, ' जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला मिळणारा निधी हा  जिल्हा परिषद सदस्यांचा आहे. त्यांच्या वाटपाचे अधिकारी सदस्यांना असायला हवेत. जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार शाबूत राहिला पाहिजेत यासाठी हे आंदोलन आहे. ' काँग्रेसचे गटनेते व सदस्य एकनाथ पाटील म्हणाले, ' जिल्हा नियोजन समिती मधून मिळणाऱ्या निधीशी आमदारांचा संबंधच काय प्रशासक कालावधीमध्ये आमदाराने हा शंभर टक्के निधी वापरला होता त्यावेळी सभागृह होते आता जिल्हा परिषदेचे सभागृह अस्तित्वात आले आहे निधी वाटपाचा सर्वाधिकार हा जिल्हा परिषदेला आहे.' जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे यांनी ' सध्या जिल्हा परिषदेचे सभागृह अस्तित्वात आहे मग सदस्यांना निधी वाटपाचा अधिकार का नाही' असा सवाल केला. जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तायशेटे म्हणाले, ' स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार संपुष्टात आणण्याचा डाव राज्य सरकारचा दिसत आहे. जिल्हा नियोजन समितीमधील जिल्हा परिषदेला मिळणारा निधी हा यापूर्वी  जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या अधिकाराखाली होता. स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांचे अधिकार शाबूत राहिले पाहिजेत' शिंगणापूर येथील अमर पाटील म्हणाले ' पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. निधी संदर्भात त्यांनी जिल्हा परिषद सदस्यांच्या भावना जाणून घ्याव्यात आणि सर्वांना समान न्याय द्यावा'
.............. .....

सोनाली सावंत यांनी लावलेला फलक ठरला लक्षवेधी
काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या सदस्य सोनाली सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारा बाहेर निधी वाटपासंदर्भात लावलेला फलक लक्षवेधी ठरला.' जिल्हा परिषदेचा अधिकार अबाधित ठेवा एकच मागणी सर्वांना समान निधी ' असा मजकूर लिहिलेला फलक हा चर्चेचा ठरला

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes