महापालिकेसाठी आरक्षण निश्चित, निवडणुकीसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग ! इच्छुक लागले तयारीला !!
schedule11 Nov 25 person by visibility 91 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर ; कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मंगळवारी 11 सप्टेंबर 2025 रोजी आरक्षण सोडत करण्यात आली. महानगरपालिकेच्या 81 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यंदा प्रथमच चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. एकूण वीस प्रभागात निवडणूक होणार आहे. एक ते 19 प्रभाग चार सदस्यीय आहेत तर वीस नंबरचा प्रभाग हा पाच सदस्यीय आहे. आरक्षण निश्चित झाल्यामुळे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता हालचाली वेगावणार आहेत. गेली पाच वर्षे सभागृह असल्यामुळे निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. दरम्यान महापालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, मुख्यलेखापाल संजय सरनाईक, नगरसचिव सुनील बिद्रे, निवडणूक अधीक्षक सुधाकर चलावाड यांनी आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबवली राबवली. सर्किट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृह येथे आरक्षण सोडत निघाली.
महापालिकेचे एकूण 81 जागेपैकी सर्वसाधारण गटासाठी 49 जागा आहेत. त्यापैकी 29 जागा ह्या सर्वसाधारण महिला गटासाठी आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसीसाठी 21 जागा आहेत त्यापैकी 11 जागा या महिला ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जाती प्रभागासाठी अकरा जागा आहेत त्यापैकी सहा जागा या अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या. आरक्षण सोडतीवेळी इच्छुक उमेदवारांनी शाहू सभागृह परिसरात गर्दी केली होती. काहींनी मनासारखे आरक्षण जाहीर झाल्यामुळे आनंद व्यक्त केला तर काही प्रभागात मनासारखे आरक्षण न निघाल्यामुळे काही जण हिरमुसले. आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे आता महापालिका निवडणुकीला वेग येणार आहे. इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत.
प्रभाग क्रमांक एक मध्ये अ - अनुसूचित जाती, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), क - सर्वसाधारण महिला तर ड - सर्वसाधारण असे निश्चित झाले आहेत. प्रभाग दोनमध्ये अ - अनुसूचित जाती, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण तर प्रभाग तीनमध्ये अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण असे जाहीर झाले. प्रभाग चार अंतर्गत अ - अनुसूचित जाती महिला, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण असे जाहीर झाले .
प्रभाग पाच अंतर्गत अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण तर प्रभाग सहामध्ये अ - अनुसूचित जाती, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण या पद्धतीने जाहीर झाले आहे. प्रभाग सात अंतर्गत अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण आहे. प्रभाग आठ अंतर्गत अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब - सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण, ड - सर्वसाधारण आहे.
प्रभाग नऊ अंतर्गत अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण तर प्रभाग दहामध्ये अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण आहे. प्रभाग अकरा अंतर्गत अ - अनुसूचित जाती महिला, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क - सर्वसाधारण, ड - सर्वसाधारण तर प्रभाग १२ मध्ये अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण आहे. प्रभाग १३ मध्ये अ - अनुसूचित जाती महिला, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क - सर्वसाधारण, ड - सर्वसाधारण तर प्रभाग १४ अंतर्गत अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब - सर्वसाधारण महिला, क - सर्वसाधारण, ड - सर्वसाधारण आहे. प्रभाग १५ अंतर्गत अ - अनुसूचित जाती, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क- सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण आहे. प्रभाग १६ अंतर्गत अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब - सर्वसाधारण महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण आहे. प्रभाग १७ अंतर्गत अ - अनुसूचित जाती महिला, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण आहे.
प्रभाग १८ अंतर्गत अ - अनुसूचित जाती महिला, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क - सर्वसाधारण, ड - सर्वसाधारण तर प्रभाग १९ मध्ये अ - अनुसूचित जाती, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण आहे. प्रभाग २० अंतर्गत अ - अनुसूचित जाती महिला, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क - नागरिकांचा मागास प्रवर्ग, ड- सर्वसाधारण महिला, इ - सर्वसाधारण आहे.