महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर- निमशिरगाव येथील विठ्ठल बाबू गावडे यांचे सुपुत्र विनायक विठ्ठल गावडे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून रसायनशास्त्र विभागात पीएच. डी. मिळवली. त्यांनी ' प्लांट एक्सट्रॅक्ट मेडिएटेड सिन्थेसिस ऑफ मेटल ऑक्साईड नॅनोस्ट्रक्चर्स अँड देअर अँप्लिकेशन इन फोटोकॅटॅलीसीस' या विषयावर संशोधन केले. त्यांना शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ. के.एम. गरडकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. डॉ. एस. आर. साबळे आणि प्रा. डॉ. आर. एस. ढब्बे (जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर) यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. विनायक गावडे यांनी आपले एमएस्सीपासून ते पीएचडीपर्यंतचे सारे शिक्षण शिवाजी विद्यापीठ येथे पूर्ण केले.