+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे.
Screenshot_20240226_195247~2
schedule12 Mar 24 person by visibility 198 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
मागील स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढत यजमान पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने सम्राटनगर स्पोर्ट्सचा २-० असा पराभव करत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. पाटाकडील तालीम मंडळाने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर झालेल्या सामन्यात पाटाकडील संघाने सांघिक खेळाचे प्रदर्शन दाखवत विजय मिळवला. सामन्याच्या २८ व्या मिनिटाला ओंकार मोरे यांच्या पासवर ऋषिकेश मेथे याने सुरेख हेडलद्वारे पाटाकडीलच्या पहिल्या गोलची नोंद केली. हीच आघाडी मध्यंतरापर्यंत कायम टिकली.
उत्तरार्धात ४८ व्या मिनिटाला पाटाकडीलने यशस्वी चढाई केली. पुन्हा एकदा ओंकार मोरेच्या पासवर प्रथमेश हेरेकरने गोल करत संघाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ओंकार मोरे आणि आदित्य कल्लोळी यांच्या चढाया अचूक समन्वयाअभावी वाया गेल्या .सम्राट नगरचा गोलरक्षक उत्कर्ष देशमुख याने उत्कृष्ट गोलरक्षण केले. पूर्ण वेळेत दोन गोलची आघाडी कायम टिकवत पाटाकडीलने सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांच्या ऋषिकेश मेथे पाटील, ओंकार मोरे, आदित्य कल्लोळी, यश देवणे, नबी खान ,प्रथमेश हेरेकर तर सम्राटनगर कडून सतपाल सिंग, नितीन पोवार, नितीन कोंडुसकर, सुमित कदम, इमरान पठाण, निवेश खान यांचा चांगला खेळ झाला. पाटाकडीलच्या अक्षय पायमल याची सामनावीर तर सम्राटनगरचा गोलरक्षक उत्कर्ष देशमुख याची लढवय्या खेळाडू म्हणून निवड झाली.
 बुधवारचा सामना 
खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ दुपारी चार वाजता.