वारे वसाहतीतील युवकाचा खून
schedule13 Jun 24 person by visibility 436 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज च कोल्हापूर : गुरुवारी दुपारी, पाठलाग करत धारदार शस्त्राने वार करत टिंबर मार्केट परिसरात तरुणाचा खून करण्यात आला. सुजल बाबासो कांबळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो वारे वसाहत परिसरात राहणारा आहे. पूर्व वैमन्यसातून ही घटना घडल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सुधाकर जोशीनगर टिंबर मार्केट मार्गावर सुजल आपल्या मित्रांसमोर बोलत बसला होता. यावेळी मोटर सायकलवरून आलेल्या चार ते पाच युवकांनी कोयता, एडक्याने वार केले .जीवांच्या आकांताने सुजय पळू लागला. हल्लेखोरांनी पाठलाग करून त्याच्यावर सपासप वार केले आणि ते पळून गेले.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुजलला त्याच्या मित्रांनी सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. सुजलचा खून झाल्याची माहिती पसरतात वारे वसाहत मधील त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी सीपीआर परिसरात गर्दी केली होती. घटनास्थळी शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.