Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये बहुमत समविचारी आघाडीलाच, अध्यक्ष निवडीत घोळ घातल्यास रस्त्यावर उतरून लढाई करूगोकुळमध्ये शासन नियुक्त चार संचालक वाढणार, मतदानाचा अधिकार मिळणार ! मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसतेज पाटलांची गोकुळबद्दलची भावना लोकशाहीसाठी कमी अन स्वतःच्या राजकीय सुलभतेसाठी अधिक- महायुतीचा टोला शासन नियुक्त संचालक संख्येवरून सतेज पाटलांचा हल्लाबोल, गोकुळमध्ये कौल आमच्याच बाजूनेकोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेस भरघोस निधी देऊ - खासदार धनंजय महाडिकपवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेबाबत संस्थाचालकांना मार्गदर्शनवारणा विद्यापीठाचा पहिला युवा महोत्सव फुलला विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी जिल्हा परिषदेत दिवाळी महोत्सव, ३२ महिला बचत गटांचा सहभागजिप कर्मचारी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालकपदी अनिता कांबळेआम्हीही जिल्हा परिषद सदस्य, आम्हालाही हवा समान निधी ! काँग्रेस सदस्य सरसावले, पालकमंत्र्यांना भेटणार ! !

जाहिरात

 

गोकुळमध्ये बहुमत समविचारी आघाडीलाच, अध्यक्ष निवडीत घोळ घातल्यास रस्त्यावर उतरून लढाई करू

schedule04 Nov 26 person by visibility 227 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ' गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये दूध उत्पादकानी समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत दिली आहे. समविचारी आघाडीचे तेरा संचालक आहेत. अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील  चुयेकर यांचे नाव निश्चित केले आहे. तेव्हा 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या सभेला महायुतीतील संचालकांनी उपस्थित राहून समविचारी आघाडीला पाठिंबा द्यावा' असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले. समविचारी आघाडीचे बहुमत असतानाही अध्यक्षपदाच्या निवडीत घोळ घालून  डावलण्याचा प्रकार झाल्यास रस्त्यावर उतरून लढाई कर, न्यायासाठी कायदेशीर मार्गाचाही अवलंब करू' असा इशारा आमदार पाटील यांनी दिला. हॉटेल सयाजी त येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.
 गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी 10 नोव्हेंबर रोजी संचालकांची पुन्हा सभा होणार आहे.  29 ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या सभेला महायुतीचे 12 संचालक गैरहजर होते. सभेचा कोरम पूर्ण होण्यासाठी 14 संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे. मात्र 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेला समविचारी आघाडीचे 13 संचालक हजार होते.
 गोकुळच्या संदर्भात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी च्या अनुषंगाने बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले गोकुळच्या निवडणुकीमध्ये दूध उत्पादकाने समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत दिले आहे. दूध उत्पादकांचे हित हाच आमचा अजेंडा आहे. आमच्याकडे स्पष्ट बहुमताचा विचार करून  अध्यक्ष पदाच्या निवडीच्या प्रक्रियेतील सभेला महायुतीच्या संचालकाने सहभागी व्हावे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्याच दिवशी मी घोषित केले आहे की दूध उत्पादकांचे हित व गोकुळ साठी 25 संचालकांनी एकत्र येऊन काम करावे. माझी लढाई ही दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्याची आहे. ना माझा मुलगा संचालक आहे,  ना मुलाला मी चेअरमन करणार आहे.' असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes