Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत दिवाळी महोत्सव, ३२ महिला बचत गटांचा सहभागजिप कर्मचारी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालकपदी अनिता कांबळेआम्हीही जिल्हा परिषद सदस्य, आम्हालाही हवा समान निधी ! काँग्रेस सदस्य सरसावले, पालकमंत्र्यांना भेटणार ! !शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात कोल्हापूर, तर मुलांच्या गटात पुणे विभाग विजेता !गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी दहा नोव्हेंबरला सभा, संचालकांना आजच सभेचे नोटीस पाठवणारसहकारी संस्थेत संचालक वाढीचा लेटरबाँम्ब, चद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र! तर गोकुळमधील संचालक संख्या ३३ !!वीर कक्कय विद्यालयात बाल कलाकारांचा बाजार, विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा रुजविणारा उपक्रमउच्च शिक्षण संस्थांमध्ये सशक्त संशोधन संस्कृती रुजवणे काळाची गरज : डॉ. महादेव लोखंडेलिंगायत माळी समाजाच्या सांस्कृतिक केंद्र-वसतिगृह बांधकामासाठी भरीव मदत करणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकरसेवा रुग्णालयातील एमआरआय-सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब - यलो फीवर लसीकरण सेंटरचे लोकार्पण

जाहिरात

 

जिल्हा परिषदेत दिवाळी महोत्सव, ३२ महिला बचत गटांचा सहभाग

schedule02 Nov 26 person by visibility 26 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देत महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत आयोजित ‘दिवाळी महोत्सव २०२६’ चे आयोजन दोन ते सहा नोव्हेंबर २०२६ या कालावधीत केले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांच्या हस्ते सोमवारी या महोत्सवाचे उद्घाटन झाले. या महोत्सवात एकूण ३२ स्वयंसहायता महिला बचत गट सहभागी झाले आहेत. या महोत्सवामध्ये उमेद अभियानांतर्गत कार्यरत महिला बचत गटांनी तयार केलेले आकाशकंदील, पणत्या, आकर्षक रांगोळ्या, दिवाळी फराळाचे विविध पदार्थ, शोभेच्या वस्तू तसेच इतर हस्तकला व गृहउपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे.उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम सभापती  सारिका नांदेकर, महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, गटनेते सुधीर देसाई, जिल्हा परिषद सदस्य संग्राम कुपेकर व शिरीष देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes