पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेबाबत संस्थाचालकांना मार्गदर्शन
schedule03 Nov 26 person by visibility 57 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पवित्र पोर्टल अंतर्गत २०२५ मधील शिक्षक भरती प्रक्रियेतील मुलाखतीसह पदभरतीबाबत जिल्हा परिषद कोल्हापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे संस्थाचालक व मुख्याध्यापकांना भरती प्रक्रियेच्या पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेची माहिती दिली. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीच्या अनुषंगाने संस्थास्तरावर करावयाची कार्यवाही, मुलाखतीसह पदभरतीची प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या नियम व मार्गदर्शक सूचनांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी राहुल मसणे यांनी शिक्षक भरती प्रक्रियेतील पुढील टप्पे नियमानुसार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासंबंधीची माहिती दिली. पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येणारी शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी डी. ए. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.