Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेस भरघोस निधी देऊ - खासदार धनंजय महाडिकपवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेबाबत संस्थाचालकांना मार्गदर्शनवारणा विद्यापीठाचा पहिला युवा महोत्सव फुलला विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी जिल्हा परिषदेत दिवाळी महोत्सव, ३२ महिला बचत गटांचा सहभागजिप कर्मचारी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालकपदी अनिता कांबळेआम्हीही जिल्हा परिषद सदस्य, आम्हालाही हवा समान निधी ! काँग्रेस सदस्य सरसावले, पालकमंत्र्यांना भेटणार ! !शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात कोल्हापूर, तर मुलांच्या गटात पुणे विभाग विजेता !गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी दहा नोव्हेंबरला सभा, संचालकांना आजच सभेचे नोटीस पाठवणारसहकारी संस्थेत संचालक वाढीचा लेटरबाँम्ब, चद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र! तर गोकुळमधील संचालक संख्या ३३ !!वीर कक्कय विद्यालयात बाल कलाकारांचा बाजार, विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा रुजविणारा उपक्रम

जाहिरात

 

वारणा विद्यापीठाचा पहिला युवा महोत्सव फुलला विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी

schedule03 Nov 26 person by visibility 34 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : वारणा विद्यापीठाचा पहिला युवा महोत्सव विविध कला आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. लोककला, नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, एकपात्री नाटक, मूकनाट्य यांसह २५ विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. विजेत्या विद्यार्थ्यांना नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष’ महोत्सवात विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी विद्यार्थ्यांनी कला सादरीकरणासोबतच त्यातून व्यावसायिक संधीही शोधाव्यात, असे आवाहन केले. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. काराजिन्नी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.  स्पर्धांमध्ये तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीने आठ, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाने चार, तात्यासाहेब कोरे अभियंत्रिकी महाविद्यालयाने सात, तर वारणा स्कूल ऑफ लॉने एका कला प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ परीक्षकांनी स्पर्धांचे परीक्षण केले.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. आर. बी. पाटील, प्रभारी वित्त व लेखाधिकारी डॉ. सी. आर. जाधव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. एम. आर. जाधव, विद्यार्थी विकास कक्षाचे संचालक डॉ. एन. एस. धाराशिवकर, प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, डॉ. डी. आर. धेडे, डॉ. ए. एस. शेरीकर, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. एम. एस. कामत, प्रा. आर. पी. भोकरे, प्रा. सुरेखा यादव, सांस्कृतिक विभागाचे प्रतिनिधी प्रा. एस. के. जंत्रे, प्रा. एम. एम. खुजट आणि एस. एस. काळे उपस्थित होतेवारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे आणि वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील यांनी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक, परीक्षक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes