Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद - पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन दिवस लांबणीवरवारसा आबाजींचा…वसा समाजकार्याचा !ङघ यययकेआयटीमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा प्रा.जयसिंग सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार ! शंकरराव घाटगे शिक्षण प्रसारक मंडळातर्फे शुक्रवारी संस्कारसोहळा कार्यक्रम !!नवे सभागृह…नवे गटनेते, महापालिका राजकारणात लागणार कसोटी !करवीर निवासिनी गृहतारण सहकारी संस्थेचे उद्घाटन, सभासदांच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल- जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे साधेपणाने होणार क्रिडाईच्या दालन प्रदर्शनाचा प्रारंभ विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू, बारामतीत विमान कोसळले जिल्हा परिषदेसाठी 241 उमेदवार! पंचायत समितीसाठी 455 जण रिंगणात !!

जाहिरात

 

विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येचा प्रश्न विधानपरिषदेत

schedule22 Mar 25 person by visibility 1406 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या १४ अधिविभागांतील विद्यार्थी घटली असून विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहचत नसल्याने ही संख्या कमी झाल्याची कबुली उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधापरिषदेत दिली. आमदार सतेज पाटील यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला. विद्यापीठात सध्या २५० हून अधिक अभ्यासक्रम शिकवले जातात. मात्र, रोजगाराच्या संधींशी सांगड न घातल्याने १४ अधिविभागात २०२३-२४ या वर्षात प्रवेश क्षमतेइतकेही विद्यार्थी मिळाले नाहीत. मानव्यशास्त्र शाखेतही विद्यार्थी संख्या कमी होत असल्याकडे आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधले होते. सध्याचे अभ्यासक्रम कालसुसंगत नसल्याने नव्या शैक्षणिक धोरणात ज्या पद्धतीने बदल अपेक्षित आहेत त्या गतीने बदल करुन हे अभ्यासक्रम रोजगाराभिमुख करण्यासाठी काय उपाययोजना केली आहे असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाच्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेचा आढावा समितीच्या अहवालानुसार १४ अधिविभागातील अभ्यासक्रमांना प्रवेशक्षमतेपेक्षाही कमी प्रवेश झाल्याची कबुली दिली. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये व संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण केंद्रांची संख्या वाढल्याने त्या महाविद्यालयांमधून विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहितीही पुरेशा प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्यानेही ही संख्या घटल्याचे मंत्री पाटील यांनी मान्य केले.

किती अभ्यासक्रम रोजगाराभिमुख ?
कमी कालावधीचे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यापीठात सुरु आहेत का, असल्यास त्यातून किती विद्यार्थ्यांना राेजगार मिळाला असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. यावर मंत्री पाटील यांनी नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाने कौशल्यआधारित अभ्यासक्रम तयार केले असून २०२४-२५ पासून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु केल्याचे सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes