Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा – चेअरमन नविद मुश्रीफगोकुळमध्ये मंत्री मुशीफांना सोडून युती करावी, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा - आमदार शिवाजी पाटीलविवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांचे निधन बागेश्वर महाराजवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, कोल्हापुरात शिवभक्तांची मागणीविवेकानंद  कॉलेजमध्ये  राजेंद्र साळुंखे  यांचा  सेवानिवृत्तीनिमत्त सत्कारशहर स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास आरोग्य निरीक्षक - मुकादमांवर कारवाई ! आयुक्त करणार पहाटेही तपासणी ! !जिपच्या स्थायी सभेत ग्रामीण प्रश्नांना वाचा, गारगोटीतील पाणी योजनेचे काम संथगतीने !गैरहजर अधिकाऱ्याना नोटिस !!गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- नविद मुश्रीफ यांची माहिती कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफरूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसे

जाहिरात

 

नारळीकर विज्ञान कथा स्पर्धेत डॉ. सुनील विभूते, दीपक कुंभार, डॉ.प्रशांत पुंडे विजेते

schedule28 Feb 26 person by visibility 338 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : अक्षर दालन आणि निर्धार प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजितज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर राज्यस्तरीय मराठी विज्ञान कथा स्पर्धा निकाल राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शनिवारी जाहीर करण्यात आला. ‘अक्षर दालन’चे अमेय जोशी आणि ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी पत्रकाव्दारे ही माहिती दिली. 

        डॉ. जयंत नारळीकर हे मुळचे कोल्हापूर.  त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही गतवर्षी ही स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि राज्याबाहेरून ५४ कथा या स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या होत्या. या कथांचे परीक्षण करून खालीलप्रमाणे निकाल जाहीर करण्यात आला आहे. डॉ. नारळीकर यांच्या स्मृतीदिनी २० मे रोजी या पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. डॉ. सुनील विभुते यांना प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये, सन्मानपत्र जाहीर झाले. दीपक भाऊ कुंभार यांना द्वितीय पारितोषिक ४ हजार रुपये, सन्मानपत्र तर 
 डॉ. प्रशांत अशोक पुंड यांना तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये, सन्मानपत्र जाहीर झाले.उत्तेजनार्थ पारितोषिक २ हजार रुपये, सन्मानपत्र हे डॉ. मोनाली हर्षे , पुणे उत्तेजनार्थ पारितोषिक १ हजार रुपये, सन्मानपत्र हे डॉ.अविनाश भोंडवे, न्यानसी दावणे व प्रज्ञा जांभेकर मुंबई यांना जाहीर झाला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes