Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा – चेअरमन नविद मुश्रीफगोकुळमध्ये मंत्री मुशीफांना सोडून युती करावी, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा - आमदार शिवाजी पाटीलविवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांचे निधन बागेश्वर महाराजवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, कोल्हापुरात शिवभक्तांची मागणीविवेकानंद  कॉलेजमध्ये  राजेंद्र साळुंखे  यांचा  सेवानिवृत्तीनिमत्त सत्कारशहर स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास आरोग्य निरीक्षक - मुकादमांवर कारवाई ! आयुक्त करणार पहाटेही तपासणी ! !जिपच्या स्थायी सभेत ग्रामीण प्रश्नांना वाचा, गारगोटीतील पाणी योजनेचे काम संथगतीने !गैरहजर अधिकाऱ्याना नोटिस !!गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- नविद मुश्रीफ यांची माहिती कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफरूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसे

जाहिरात

 

संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात

schedule01 Mar 26 person by visibility 161 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  शिक्षण, उद्योग आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत भक्कम ठसा उमटवणारे संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.  संजय घोडावत विद्यापीठ च्या  प्रांगणात तसेच संजय घोडावत समूहाच्या मुख्य कार्यालयात सकाळपासूनच हितचिंतकांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन  शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नीता घोडावत, विजयचंद घोडावत, राजेश घोडावत, राकेश घोडावत, सचिव श्रेणिक घोडावत, सलोनी घोडावत, विश्वस्त  विनायक भोसले, कुलगुरू  डॉ. उद्धव भोसले, रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे, संचालक डॉ. विराट व्ही. गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

 विश्वस्त विनायक भोसले यांनी संजय घोडावत यांच्या दूरदृष्टी, ठाम निर्णयक्षमता आणि प्रत्येक कार्यातील आत्मविश्वासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या कार्यप्रवासातील यशोगाथा उलगडत नेतृत्वाचे प्रेरणादायी पैलू त्यांनी अधोरेखित केले. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीत त्यांच्या नेतृत्वाचे मोल विशद केले.

स्वतःच्या मनोगतात चेअरमन संजय घोडावत यांनी संघभावना, सातत्यपूर्ण परिश्रम आणि निष्ठेवर भर देत, “हे यश माझे नसून माझ्यासोबत कार्यरत प्रत्येक सहकाऱ्याचे आहे,” असे स्पष्टपणे नमूद केले. समाजसेवेच्या भावनेतून ' नीता संजय घोडावत फाउंडेशन' च्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच कर्नाटक डीलर असोशियन अंतर्गत ' चेअरमन संजय घोडावत' पुस्तकाचे प्रकाशन समारंभ पार पडला.  प्रमोद कमलाकर यांनी सुवर्णमूर्ती अर्पण करून त्यांचा सत्कार केला.  प्रा. सोहन तिवडे यांनी  सूत्रसंचालन केले. रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे  यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes