Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन कलापर्व जल्लोषातजिल्हयातील १८ ग्रामपंचायतींना एक लाखाचे प्रोत्साहनपर बक्षीसनारळीकर विज्ञान कथा स्पर्धेत डॉ. सुनील विभूते, दीपक कुंभार, डॉ.प्रशांत पुंडे विजेतेआलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कारभिशीचे रुपांतर पतसंस्थेत…आता शंभर कोटीच्या ठेवीकडे वाटचालचार्टर्ड अकौंटंट्स  कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी सीए आशिष सेवेकरी, उपाध्यक्षपदी अलोक शहा कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड सतरा मार्चला ! पंचायत समिती सभापती दहा मार्चला निवडणार!!शिक्षण घेणं म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान मिळवणं नव्हे तर माणूस म्हणून जगणे महत्त्वाचे - कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहातकृष्णराज महाडिकांचे  रविवारी कोल्हापुरात होणार  जल्लोषी स्वागत

जाहिरात

 

जिल्हयातील १८ ग्रामपंचायतींना एक लाखाचे प्रोत्साहनपर बक्षीस

schedule28 Feb 26 person by visibility 91 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात आलेल्या सुपोषित ग्रामपंचायत अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याने उत्तेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींची उत्कृष्ट कार्याबद्दल निवड झाली असून राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशस्वी ग्रामपंचायतींना केंद्र सरकारमार्फत प्रत्येकी १ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस आणि विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के यांनी दिली. 

पुरस्कारास पात्र ठरलेल्या १८ ग्रामपंचायतीमध्ये आजरा तालुक्यातील कासारकांडगाव, साळगांव, कोवाडेचा समावेश आहे. भुदरगड तालुक्यातील मुदाळ, व्हनगुत्त तर गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे, उंबरवाडीचा समावेश आहे. गगनबावडा तालुक्यातील कोदे, अणदुर, साखरी म्हांळुगे, कागलमधील पिंपळगाव खुर्द,  करवीरमधील हलसवडे, पाडळी बुद्रुकचा समावेश आहे. पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फ आळते, कसबा बोरगांव, काळजवडे तर राधानगरीतील  घोटवडे, नरतवडे या गावांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्य व कुंटूब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. व जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली याकामी शिरोळच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी मनिषा पालेकर आणि जिल्हा कक्षाचे विस्तार अधिकारीसौरव कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes