Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा – चेअरमन नविद मुश्रीफगोकुळमध्ये मंत्री मुशीफांना सोडून युती करावी, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा - आमदार शिवाजी पाटीलविवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांचे निधन बागेश्वर महाराजवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, कोल्हापुरात शिवभक्तांची मागणीविवेकानंद  कॉलेजमध्ये  राजेंद्र साळुंखे  यांचा  सेवानिवृत्तीनिमत्त सत्कारशहर स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास आरोग्य निरीक्षक - मुकादमांवर कारवाई ! आयुक्त करणार पहाटेही तपासणी ! !जिपच्या स्थायी सभेत ग्रामीण प्रश्नांना वाचा, गारगोटीतील पाणी योजनेचे काम संथगतीने !गैरहजर अधिकाऱ्याना नोटिस !!गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- नविद मुश्रीफ यांची माहिती कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफरूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसे

जाहिरात

 

आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कार

schedule28 Feb 26 person by visibility 214 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन :  शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ या ललित लेखसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांच्या ईश्वरपूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय-२०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, शाखेचे अध्यक्ष प्रा. दीपक स्वामी यांनी नुकतीच पुरस्कारांची घोषणा केली.
डॉ. जत्राटकर यांचा ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा ललित लेखसंग्रह कोल्हापूरच्या भाग्यश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला असून यामध्ये मानवतावादाच्या सूत्रामध्ये गुंफलेल्या निवडक ३० लेखांचा समावेश आहे. व्यापक जागतिक समुदायामध्ये मानवी मूल्यांच्या प्रतिष्ठापनेचा आग्रह या लेखनामागे आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे.
डॉ. जत्राटकर यांची ‘निखळ: जागर संवेदनांचा’, ‘समाज आणि माध्यमं’ ही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. त्यांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर, शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ, मिरज आणि ध्यास फाऊंडेशन, पलूस आदी संस्थांचे प्रतिष्ठेचे पुरस्कारही लाभले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes