गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी दहा नोव्हेंबरला सभा, संचालकांना आजच सभेचे नोटीस पाठवणार
schedule02 Nov 26 person by visibility 343 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 10 नोव्हेंबर 2026 रोजी संचालकांची सभा घेण्याचे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचने दिले. तसेच या सभेसंदर्भातील नोटीस सर्व पंचवीस संचालकांना सोमवारी दोन नोव्हेंबर रोजी लागू करावेत असेही कोर्टाने म्हटले आहे.
महायुती व महाविकास आघाडीतील कुरघोडीच्या राजकारणामुळे गोकुळचे अध्यक्ष निवड लांबणीवर पडली होती. 29 ऑक्टोबर 2026 रोजी गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी सभा बोलविण्यात आली होती निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला महाविकास आघाडीचे 13 संचालक उपस्थित होते. तर महायुतीचे बारा संचालक गैरहजर राहिले होते. मात्र कोरम पूर्ण होण्यासाठी चौदा संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे या कारणास्तव सभा तहकूब करण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या संचालकांनी आपल्याकडे बहुमत आहे, शशिकांत पाटील चुयेकर यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड करावी अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकार्याकडे धरली. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने कोरम च्या मुद्याकडे लक्ष वेधत ही मागणी मान्य केली नाही. त्यानंतर महाविकास आघाडीच्या संचालकांनी एकत्र येत संचालक बाबासो चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली शशिकांत पाटील चुयेकर यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड केली. तसेच अध्यक्षपदी चुयेकर यांची केलेली निवड वैध ठरावी यासाठी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी दोन नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली.तसेच या सुनावणीला मागील सभेला गैरहजर राहिलेले महायुतीचे बारा संचालकांना उपस्थित राहण्याचे आदेश ही सर्किट बेंचने यापूर्वी दिले होते.
सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान सर्किट बेचने येत्या 10 नोव्हेंबर 2026 रोजी गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी संचालकांची सभा घ्यावी तसेच या सभेची नोटीस सर्व पंचवीस संचालकांना सोमवारी दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत लागू करावी असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी 10 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी अकरा वाजता संचालकांची सभा होणार आहे