+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेश क्षीरसागर धावले पूरग्रस्तांच्या भेटीला, भर पावसात विविध ठिकाणांची पाहणी adjustकाँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ! समन्वय समितीत स्थान ! adjustजयंती नाल्यावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद adjust४०९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ! सीईओंनी शब्द पाळला, शिक्षणाधिकाऱ्यांचे गतीमान कामकाज !! adjustपावसाचा रपाटा- पाण्याचा विळखा कायम ! घरांची पडझड, नागरिकांचे स्थलांतर!! adjustकास्ट्राइब शिक्षक संघटना कोल्हापूरतर्फे आरक्षण दिन साजरा adjustपूरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे धाव adjustभारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा adjustजबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी adjustदेवराज बोटिंग क्लबने रंकाळा तलावातील कचरा हटविला
1000653813
1000630884
1000621806
1000615695
schedule14 Mar 24 person by visibility 246 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर 

रेखा सम्राट टी. के. वडणगेकर यांच्या २३ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘गुरु शिष्य’ उपक्रमांतर्गत कलाप्रदर्शनाचा प्रारंभ  शुक्रवारी,  १५ रोजी होत आहे. प्रदर्शनाचे उदघाटन सकाळी १०.३० वाजता शाहू स्मारक भवन येथे विजयमाला मेस्त्री-पेंटर यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आहेत. दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटच्या सचिव प्रा. अर्चना आंबिलधोक, प्राचार्य अजय दळवी, उदय कुंभार यांची प्रमुख उपस्थिती आहे. या सोहळ्यात के. आर. कुंभार उपक्रमशील युवा कलाकार पुरस्कार शिल्पकार ओंकार कोळेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनामध्ये विजय टिपुगडे, विलास बकरे, शिवाजी मस्के, मनोज दरेकर,संतोष पोवार, नागेश हंकारे, बबन माने, अभिजीत कांबळे, प्रविण वाघमारे, गजेंद्र वाघमारे, शैलेश राऊत, किशोर राठोड,राहूल रेपे, विजय उपाध्ये, अरिफ तांबोळी, प्रकाश मोहिते, नवज्योत काळे, सर्वेश देवरूखकर, पुष्कराज मेस्त्री, शुभम कुंभार, ओंकार कोळेकर, इंद्रजित बंदसोडे, पुनम राऊत, सुदर्शन वंडकर यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. हे प्रदर्शन  १५ ते २१ मार्च या कालावधीत सवार्साठी खुले राहणार आहे.