Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची पदोन्नती सेवा ज्येष्ठतेने व्हावी, शिक्षक संघटना बैठकीत मागणीसिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये १७ तासांची ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीशिक्षक संघ थोरात गटाची गुरुवारी राळेगणसिद्धीत महामंडळ सभाजीएसटी प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यातील अधिकारी महिन्यातून एकदा कोल्हापुरात येणारमुख्यमंत्र्यांचा शक्तिपीठ महामार्गचा सिनेमा कोल्हापूरसह तेरा जिल्ह्यात फ्लॉप होणार - सतेज पाटील सरकारी कंत्राटदारांचे रविवारी कोल्हापुरात महाअधिवेशन ! थकित बिलाचा विषय ऐरणीवर, फेडरेशनची स्थापना होणार !!शक्तिपीठ  महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार !  एकच निर्धार , शक्तिपीठ हद्दपार !!शाहू महाराज हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखेंची  जयंती साजरीहलाल प्रमाणपत्र रद्द करत नाहीत तोपर्यंत लढा चालू - रमेश शिंदेविद्यापीठ विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली कुलगुरुंची भेट

जाहिरात

 

टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची पदोन्नती सेवा ज्येष्ठतेने व्हावी, शिक्षक संघटना बैठकीत मागणी

schedule10 Jun 26 person by visibility 126 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम 1967 नुसार कोणतेही पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांच्या पदोन्नती या सेवाजेष्ठतेने असल्याने सर्व प्रकारच्या पदोन्नती या सेवाजेष्ठतेने व्हाव्यात यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा सर्व शिक्षक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
      जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी कोल्हापूर येथे  झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघांचे राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट होते. पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्यध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले, ' एक सप्टेंबर २०२५ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामधील कलम 216 अन्वये शिक्षकांना पदोन्नती हवी असेल तर टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचे आदेश आहेत. त्याचा  सन्मान ठेवत अनेक सेवा ज्येष्ठ  शिक्षक वयाच्या 50 ते 57 व्या वर्षी टीईटी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र राज्याचे शिक्षण संचालक यांचे  14 मे 2026 च्या पत्राचा आधार घेत राज्यातील पदोन्नती प्रक्रियेमध्ये  एक सप्टेंबर 2025 पूर्वी टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना प्राधान्य दिले जात आहे. हा टीईटी उत्तीर्ण असलेल्या सेवाजेष्ठ शिक्षकांवर अन्याय असून सरकारने पदोन्नती समिती बैठकीच्या दिनांकाची पात्रता विचारात पदोन्नती प्रक्रिया होणे आवश्यक आहे.
     शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद तौदकर म्हणाले, " एकदा सेवा कनिष्ठ शिक्षक पदोन्नत झाले तर त्या जागा लवकर रिक्त होणार नाहीत. त्यामुळे सेवा जेष्ठ शिक्षक पात्र असूनही पदोन्नतीविना सेवानिवृत्त होणार आहेत.उलट पूर्वीप्रमाणे प्रमोशन झाली तर प्रत्येकाला प्रमोशन मिळत राहील
       शिक्षक संघांचे जिल्हाध्यक्ष बबन केकरे म्हणाले वरिष्ठ पदावर पादोन्नती होताना अनुभव महत्वाचा असल्याने सेवाजेष्ठतेनेच पदोन्नती होणे आवश्यक आहे. शिक्षक संघ थोरात गटाचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी मेढे म्हणाले, सरकारने आतापर्यंत शिक्षकांना टीईटी अनिवार्य असल्याचे कळवले नव्हते. सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयानंतर टीईटी उत्तीर्ण झालेल्या सेवाजेष्ठ शिक्षकांना पदोन्नती मिळणे हा त्यांचा हक्क आहे.
सरकारची विसंगत भूमिका 
 सरकारच्या चार जून  2026 पत्रानुसार केंद्र प्रमुख  परीक्षेसाठी  3 फेब्रुवारी 2026 अखेर टीईटी उत्तीर्ण पात्र समजण्यात आले आहेत. आणि नियमित पदोन्नतीसाठी मात्र पदोन्नती प्रक्रिया अखेरची पात्रता विचारात घेतली जात नाही. हे सरकारचे धोरण विसंगत असल्याचे अनेकांना मत व्यक्त केले.
बैठकीस प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे, श्रीकांत टिपूगडे, मनोज माळवदकर, साताप्पा चौगले, श्वेता खांडेकर, नवनाथ व्हरकट, सखाराम राजुगडे, रमेश अमानगी, जयसिंग माळवी, विनायक कोरोचीकार, रावसाहेब पाटील, मधुकर भाटले, बाळनाथ डवरी, शंकर फासके आदी उपास्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes