शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार ! एकच निर्धार , शक्तिपीठ हद्दपार !!
schedule09 Jun 26 person by visibility 70 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात मंगळवारी (9 जून 2026 ) शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला. ' एकच जिद्द - शक्तिपीठ रद्द, एकच निर्धार - शक्तीपीठ हद्दपार ' असा नारा बुलंद करत हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही. शक्तिपीठ महामार्ग जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न केला तर आंदोलनाच्या माध्यमातून सरकारची झोप उडवू असा इशारा रा दिला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग होईपर्यंत लढा थांबणार नाही असा इशारा दिला. या सभेत नेते मंडळींनी, शक्तिपीठ महामार्गावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आंदोलन स्थळी येत शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला. जन भावनेच्या विरोधात जाऊन शक्तिपीठ महामार्ग करणे योग्य ठरणार नाही असे त्यांनी सरकाला ठणकावले. सभेत, 'गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे' असा निर्धार शेतकऱ्यांनी केला.
शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने या मोर्चाचे आयोजन केले होते. गेले महिनाभर ग्रामीण भागामध्ये मोर्चाच्या नियोजनाची तयारी सुरू होती. मंगळवारी मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चामध्ये उतरले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दसरा चौक येथून मोर्चाला प्रारंभ झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते व आमदार सतेज पाटील, माजी आमदार संपतराव पवार पाटील, माजी आमदार सत्यजित जाधव, माजी आमदार ऋतुराज पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए वाय पाटील, कॉम्रेड उदय नारकर, गिरीश फोंडे, संपत देसाई, आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चाला प्रारंभ झाला. या मोर्चामध्ये महिला शेतकऱ्यांचीही संख्या लक्षणीय होती. " जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा शक्तीपीठ मार्ग रद्द झालाच पाहिजे, एकच जिद्द - शक्तिपीठ महामार्ग रद्द, एकच निर्धार - शक्तीपीठ महामार्ग हद्दपार " अशा आशयाचे फलक व घोषणा देत मोर्चा मार्गस्थ झाला. व्हीनस कॉर्नर, बसंत बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील विविध भागातून हजारो शेतकरी सहभागी होत शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर झालेल्या सभेत शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेते मंडळींनी शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही, हा रस्ता शेतकऱ्यांना उध्वस्त करणार आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ दिला जाणार नाही असा इशारा दिला.
या मोर्चामध्ये जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे गटनेते सुधीर देसाई, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, सागर धुंदरे, बिद्री कारखान्याचे संचालक मनोज फराकटे, सत्यजित जाधव, राधानगरी पंचायत समितीचे सभापती आर वाय पाटील, भोगावतीचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शशिकांत खोत, बाबासाहेब देवकर, राहुल देसाई, जीवन पाटील, पांडुरंग भांदिगरे, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील, अनिल सोलापुरे, किशोर पाटील, सम्राट मोरे शिवाजी मगदूम, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, काँग्रेसचे पदाधिकारी बाळासाहेब सरनाईक, भारत पाटील, नगरसेवक राहुल माने, विनायक फाळके, विनायक सूर्यवंशी, प्रवीण पाटील, आदींचा सहभाग होता. सांगली सातारा सोलापूरसह विविध भागातील शेतकरी प्रतिनिधींनी या मोर्चामध्ये सहभाग होत पाठिंबा दिला.