हलाल प्रमाणपत्र रद्द करत नाहीत तोपर्यंत लढा चालू - रमेश शिंदे
schedule09 Jun 26 person by visibility 7 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हलाल प्रमापत्राला श्रीलंका देशाने व उत्तर प्रदेशातील योगी सरकारने बंदी घातली आहे. मग महाराष्ट्रात हलाल प्रमाणपत्र कशासाठी ? हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. हलाल प्रमाणपत्राची सक्ती थांबत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील.’असे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घेतले. आखाती देशातील निर्यातीसाठी हलाल प्रमाणपत्र घेण्याची गरजच काय आहे असा सवाल त्यांनी केला.
जमियत उलेमा ए हिंद या संघटनेमार्फत हलाल प्रमाणपत्र दिले जाते. त्या प्रमाणपत्रासाठी आकारण्यात येणारी रककम आंतकवाद्यांना वाचविण्यासाठी वापरली जाते असा आरोप शिंदे यांनी केला. संघटनेने प्रमाणपत्रासाठी आकारली जाणारी फी थांबवावी, हलाल विरोधातील याचिका मागे घेऊ असे शिंदे म्हणाले. महाराष्ट्रात दुधाच्या उत्पादनापेक्षा मागणी जास्त आहे. अश्ी स्थिती असताना दुग्धजन्य पदार्थाची निर्यात कशासाठी असा सवाल त्यांनी केला. गोकुळ दूध संघाने हलाल प्रमाणपत्र स्वीकारताना दूध उत्पादकांना विचारात घेतले होते का ? अशी विचारण त्यांनी केली. जोपर्यंत हलाल प्रमाणपत्राची सक्ती थांबत नाही तोपर्यंत लढा चालू राहील असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला गजानन तोडकर, शिवानंद स्वामी, संभाजी भोकरे, निरंजन शिंदे, किशोर घाटगे आदी उपस्थित होते.