विश्वराज महाडिकांच्या विवाहनिमित्त शाही स्वागत सोहळा
schedule20 May 24 person by visibility 686 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र आणि भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज आणि गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सी. आर. पाटील यांची पुतणी मंजिरी यांचा नुकताच विवाह सोहळा झाला. यानिमित्ताने रविवारी कोल्हापुरातील हायलँड क्लब येथे शाही स्वागत समारंभ पार पडला. अत्यंत दिमाखदार अशा या सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, औद्योगिक, कला-क्रीडा, प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावून, वधुवरांना शुभाशिर्वाद दिले. त्यामध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, मालोजीराजे छत्रपती, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, नामदार चंद्रकांतदादा पाटील, सुभाष देशमुख, लक्ष्मणराव ढोबळे, खासदार सुजय विखे-पाटील, धैर्यशिल माने, श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, हेमंत पाटील, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर, शिवेंद्रराजे भोसले, रणजितसिंह मोहिते- पाटील, प्रसाद लाड, धैर्यशिल मोहिते-पाटील, पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, उद्योगपती संजय घोडावत, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, माजी खासदार राजू शेट्टी, कुलगुरू डी.टी. शिर्के, काडसिध्देश्वर स्वामी यांच्यासह अनेक मान्यवरांनी नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, अरूंधती महाडिक, स्वरूप महाडिक, अमल महाडिक, शौमिका महाडिक, पृथ्वीराज महाडिक, वैष्णवी महाडिक, कृष्णराज महाडिक यांनी सर्वांचे स्वागत केले.