+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule20 May 24 person by visibility 250 categoryलाइफस्टाइल
सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या लौकिकात मानाचा तुरा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
मेंदू शस्त्रक्रियेत अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या तुर्की देशातील यासरगिल मायक्रोन्युरोसर्जिकल ॲकॅडमी या संस्थेमार्फत सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे वैद्यकीय संचालक व  मेंदू शस्त्रक्रियातज्ञ डॉ. शिवशंकर मरजक्के यांना भारतातून सर्वात तरुण न्युरोसर्जन म्हणून प्रतिष्ठीत नामांकन मिळाले. त्यांना २०२४ इस्तंबूल, तुर्की येथे होणाऱ्या  यासरगिल मायक्रोन्युरोसर्जरी " काँग्रेसमध्ये "वक्ता आणि प्राध्यापक" म्हणून विशेषाधिकाराने आमंत्रित करण्यात आले आहे.
गाझी यासरगिल हे ९८ वर्षांचे दिग्गज न्यूरोसर्जन आणि आधुनिक मायक्रोन्युरोसर्जरीचे जनक म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांना भेटणे ही कोणत्याही न्यूरोसर्जनसाठी आयुष्यभराची उपलब्धी असते, अशा प्रतिष्ठित अकादमीमध्ये वक्ता म्हणून नामांकन मिळणे आणि आमंत्रित करणे ही एक गौरवाची बाब आहे. या विशेष अधिवेशनासाठी भारतातून निवडक अशा १० न्यूरोसर्जन यांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी सर्वात तरुण न्युरोसर्जन म्हणून डॉ. मरजक्के यांची निवड गौरवास्पद आहे.  
 कणेरी येथील ग्रामीण भागात गेली १० वर्ष अविरत सेवा देणाऱ्या डॉ. मरजक्के यांनी मेट्रो शहरात होणाऱ्या मेंदूच्या अनेक अत्यंत जटील शस्त्रक्रिया ग्रामीण भागातील सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये केल्या आहेत, त्यामुळे सिद्धगिरी हॉस्पिटल हे ग्रामीण भागात अत्याधुनिक सेवा देणारे केंद्र म्हणून नावारूपास आले आहे.  मरजक्के यांच्या या सेवाभावी वृत्तीची दखल आतंरराष्ट्रीय स्तरावर घेवून त्यांना या विशेष अधिवेशनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.  काडसिद्धेश्वर स्वामी यांनी   सिद्धगिरी हॉस्पिटल प्रशासनातर्फे डॉ. मरजक्के यांचे अभिनंदन केले.