Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गडहिंग्लजच्या प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी!विद्यार्थी चमकले शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत, शाळेने काढली मिरवणूक झोकात!व्यापारी किशोरकुमार नष्टे यांचे निधनजुनी पेन्शनसाठी शिक्षकदिनी शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चानैसर्गिक न्यायतत्वाद्वारे त्या संस्थांनाही मतदानाचा अधिकार मिळावा -विकास पाटील कुरुकलीकरकोल्हापुरात मंगळवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनविवेकानंद संस्थेकडून ४४ हजार फॉर्म जमा, चंद्रकांत पाटील म्हणाले, तर कौस्तुभला तिकीट अन् विजयही निश्चितस्थायी समितीत पाठपुरावा, ४३३ ग्रामपंचायतीला मिळाले आर्थिक खर्चाचे अधिकारविवेकानंद शिक्षण संस्था ठरवेल तोच  पुणे शिक्षक मतदारसंघाचा आमदार असेल - मंत्री चंद्रकांत पाटीलन्यायालयाच्या निर्णयांचा चुकीचा अर्थ काढून बोगस संस्थांना अभय

जाहिरात

 

विद्यार्थी चमकले शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत, शाळेने काढली मिरवणूक झोकात!

schedule22 Aug 26 person by visibility 73 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : शिष्यवृत्ती परीक्षेतील यश आणि श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर असे जणू समीकरण बनले आहे. शैक्षणिक उपक्रमासह विविध स्पर्धेत सातत्याने यशाचा आलेख उंचावत असलेल्या या विद्यामंदिराच्या इयत्ता चौथी पाचवी व सातवीच्या तब्बल १३४ विद्यार्थ्यांनी १४ लाख साठ हजार इतकी शिष्यवृत्ती खेचून आणली. विद्यार्थ्यांचे हे यश शाळेसाठी अभिमानस्पद. मुलांच्या या यशाचे कौतुक करताना शाळेने चक्क वाजतगाजत मिरवणूक काढली.  राज्य व जिल्हा गुणवत्ताधारक विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक यांना फेटा बांधून, फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल-झांज-हलगीच्या कडकडाटात आणि ताल धरायला लावणाऱ्या लेझीमच्या ठेक्यावर ही मिरवणूक निघाली. मुलांचे हे यश पाहण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती.  या मिरवणुकीत शिक्ष्घ्क व शिक्षिकेंनीही सहभाग होत मुलांचा आनंद द्विगुणित केला. शिक्षक व महिला शिक्षकांनी लेझीम  खेळाचा आनंद लुटला. 

रामानंदनगर पासून ते शाळा परिसरापर्यंत निघालेली मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. मुख्य मार्गावर पुष्पवृष्टी, घोषणा व वादन वाद्यांचे निनाद यामुळे सारे  भारावले होते. प्राथमिक शिक्षण समिती नूतन शिक्षण सभापती  शीला सोनुले , नगरसेवक तथा क्रीडा समिती सभापती विजयसिंह खाडे पाटील, प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी जयश्री जाधव, सामाजिक कार्यकर्ते  प्रशांत जरग, वैभवी जरग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.
चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वर्षभर मार्गदर्शन करणारे बी. आर. पिंपळकर.  सुभाष मराठे, तानाजी दराडे, संतोष मोरमारे, नंदकुमार पाटील, मेघा सावंत, किरण माळी, मनिषा रेडेकर, ललिता आढाव आहेत. पाचवीसठी मार्गदर्शक म्हणून वर्षा संभाजी पाटील, सुजाता संजय दाभोळकर, ज्योती संदीप उबाळे, दिग्विजय लगमान्ना नाईक, पल्लवी दिगंबर देसाई, सुरेश आप्पा केरुरे, सहदेव विठ्ठल कांबळे, सुवर्णा विलास पाटील यांनी काम पाहिले. सातवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शक म्हणून  सुवर्णा सोनाळकर, सुजाता पोळ, अजित कानकेकर, वंदिता महाडिक, प्राजक्ता भंडगे पृथ्वीराज आडनाईक यांनी काम केले. दरम्यान मिरवणुकीच्या उद्घाटनसप्रंगी      प्राथमिक शिक्षण समितीचे पर्यवेक्षक  विजय माळी, शिष्यवृत्ती विभागप्रमुख  संजय शिंदे, मुख्याध्यापिका नीता ठोंबरे,  माजी नगरसेवक सुनील पाटील , क्रीडा निरीक्षक  सचिन पांडव , राजेंद्र आपुगडे, माजी पर्यवेक्षिका श्रीमती विमल गवळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर पाटील शिक्षक शिवाजी पाटील, बाळासाहेब काळे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes