Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
 अभियंता तरुण पिढीने उद्योजकीय मानसिकता बाळगावी - दीपक जोशी२१ लिटर दुधाची म्हैस, ३५ लिटर दुधाची गाय ठरली गोकुळश्रीकोल्हापुरात गव्हर्मेंट लॉ कॉलेज सुरू करा-: अमल महाडिकांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणीएनएमएमएस परीक्षा 28 डिसेंबरलासीपीआरमधील वैद्यकीय बिलांच्या चौकशीसाठी समिती, पालकमंत्र्यांचे आदेशाने समिती स्थापन रहिवासाचा कोणताही पुरावा ग्राह्य धरा : माजी नगरसेवकांची आयुक्तांच्याकडे मागणी महापालिकेची अंतिम मतदार यादी पुन्हा लांबणीवर, 15 डिसेंबरला यादी जाहीर होणार खाबुगिरीची सेवा, सीपीआरमधील मॅडम, सरांच्या नावावर लाखोची आकडेमोड! वैद्यकीय बिल मंजुरीत डल्ला !!ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचे धरणे आंदोलन, संचमान्यतेतील त्रुटी दूर कराशिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांची कोल्हापुरात बदली

जाहिरात

 

प्लास्टिकचा राक्षस विद्यार्थ्यांनी केला  बाटलीत  बंद !

schedule22 May 25 person by visibility 667 categoryआरोग्य

विवेकानंद कॉलेजचा पर्यावरणपूरक उपक्रम, २०० किलो प्लास्टिकचे संकलन

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : एकल वापर प्लास्टिक हे पर्यावरणास खूप घातक ठरत आहे. कारण ते पुनर्वापर(Reuse)करता येत नाही, तसेच पुनर्चक्रीकरण करणे दुरापास्त असते. मग ते गटारे - प्रवाह तुंबणे, प्राण्यांच्या पोटात जाऊन अडकून बसणे, समुद्रतळाशी जाऊन तेथील जैवविविधता धोक्यात आणणे हे दुष्परिणाम घडवून आणतात.  म्हणून त्यानिमित्ताने विवेकानंद ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण विभागामार्फत एक उपक्रम दिला होता. त्याचे नाव होतेप्लास्टिकचा राक्षस....करा बाटलीत बंद ! एकल वापर प्लास्टिकचे संकलन हा उपक्रमाचा उद्देश.

इयत्ता ११वी आर्ट्स आणि कॉमर्स मधील जवळपास ६०० विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेऊन जवळपास २०० किलो प्लास्टिकचा राक्षस बाटलीत बंद केला आहे. यामध्ये चॉकलेट, प्लास्टिक पिशवी, स्ट्रॉ असे बरेच वस्तू प्रकार आहेत. या उपक्रमाविषयी सांगताना प्राचार्य आर. आर. कुंभार म्हणाले, विवेकानंद महाविद्यालय हे विद्यार्थ्याच्या सर्वांग विकासासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. प्लास्टिक समस्या आज पर्यावरणासाठी मोठे आव्हान ठरत असताना महाविद्यालयाने राबविलेला हा उपक्रम सर्वांसाठी मार्गदर्शक  आहे.’

ज्युनिअर कॉलेजच्या आर्टस, कॉमर्स विभागप्रमुख प्रा. शिल्पा भोसले यांनी, ‘प्लास्टिक हे पर्यावरणासाठी एक गंभीर धोका आहे. ते विघटन न होणारे असून हजारो वर्षे जमिनीत राहते. प्लास्टिकमुळे माती, पाणी आणि समुद्री जीवसृष्टीचे मोठे नुकसान होते.त्यामुळे प्लास्टिक वापर कमी करणे आणि पर्यावरणपूरक पर्याय निवडणे ही काळाची गरज आहे.  निसर्ग संपदेचे संवर्धन , नैसर्गिक स्तोत्रांचे जतन .. हे संस्कार विद्यार्थ्यांच्यात रुजवण्याचे काम महाविद्यालय वेगवेगळ्या उपक्रमातून करत असते.’

पर्यावरण आणि जलसुरक्षा विभागचे  प्रा.अनिल धस, यांनी, ‘पर्यावरण हा अतिशय संवेदनशील विषय असून आज भावीपुढे प्लास्टिक व इतर पर्यावरणीय समस्यांमुळे अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना, लढा प्लॅस्टिक प्रदूषणाशी असा आहे.  पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा या विषयाच्या माध्यमातून तरुणांना सहभागी करून घेऊन या समस्या सोडविणे शक्य आहे.” 

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes