Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ब्राह्मण समाजाला सरकारकडून घोषणांची नव्हे, उत्तरदायित्वाची गरज ! गोलमेज परिषदेत राज्यव्यापी कृती समितीची स्थापना ! !न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्रफार्मसीच्या विद्यार्थ्याला 38 लाखाचे पॅकेज, संजय घोडावतनी केले अभिनंदनअरुंधती महाडिक बनल्या लेखिका ! उलगडला नाईक -निंबाळकर घराण्याचा इतिहास, शाही पाककलांचा स्वाद !!वारणा विद्यापीठ करणार आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाची देवाणघेवाणशिवाजी विद्यापीठातील उपकुलसचिवांच्या बदल्या, काही जणांचा एकाच ठिकाणचा मुक्काम हललाप्रा. श्वेता परुळेकर यांना पीएचडीनऊ जुलैला जिल्ह्यातील शाळा बंद, संस्थाचालक - शिक्षक काढणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पावसाची संततधार, सात बंधारे पाण्याखाली ! राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद !!अकरावी प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी ओपन टू ऑल

जाहिरात

 

चालुक्य स्पोर्टस अॅकेडमीतर्फे क्रीडा महोत्सव, प्रवेश निशुल्क

schedule20 May 26 person by visibility 209 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील चालुक्य स्पोर्टस अॅकेडमीतर्फे श्री दत्त क्रीडा संकुल, पुंगावकर माळा, न्यू पॅलेस जवळ क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे. या क्रीडा महोत्सवामध्ये दहा विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होतील. स्पर्धेसाठी कसलेही शुल्क नाही. २१ ते ३० मे २०२६ या कालावधीत हा महोत्सव होत आहे अशी माहिती संयोजक व अॅकेडमीचे उपाध्यक्ष अवधूत साळोखे, सदस्य श्रृती पुंगावकर व सचिव संतोष बाबर यांनी दिली. या महोत्सवातंर्गत २१ ते २३ मे या कालावधीत बास्केटबॉल् स्पर्धा तर २४ मे रोजी धनुर्विद्या स्पर्धा होईल. जिम्नॅस्टिक्स २५ मे रोजी तर कुस्ती स्पर्धा २६ मे रोजी होणार आहे. २७ मे रोजी बॉक्सिंग तर २८ मे रोजी वेटलिफ्टिंग स्पर्धा होत आहे. शिवकालीन मर्दानी खेळ स्पर्धा २९ मे रोजी तर फेन्सिंग स्पर्धा ३० मे रोजी होईल. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.  पत्रकार परिषदेला विजय जाधव, शुभम पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes