पाचगावमधील होम मिनिस्टर स्पर्धेत शुभांगी गाडगीळ विजेत्या
schedule27 Dec 25 person by visibility 15 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महिलांच्या कलागुणांना वाव आणि त्यांना सन्मानाचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील यांनीवतीर्ंने होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. ग्रामपंचायत कार्यालय शेजारील महादेव मंदिर येथे स्पर्धा झाली. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये शुभांगी गाडगीळ या विजेत्या ठरल्या. करिश्मा मुल्लाणी, प्रतिक्षा चव्हाण या अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. ऐश्वर्या पाटील, प्रज्ञा दावले, वैशाली पवार यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील, उपसरपंच दीपाली गाडगीळ, सदस्या रोमा नलवडे, सीमा पोवाळकर, मनिषा आसबे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण विशाल पाटील-बेलवळेकर यांनी केले.