काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ४८ उमेदवारांची घोषणा ! सोळा नगरसेवकांना उमेदवारी !
schedule27 Dec 25 person by visibility 89 categoryमहानगरपालिका
चौदा उमेदवार नगरसेवकांच्या कुटुंबांतील सदस्य, एकाच कुटुंबांत दोघांना उमेदवारी
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी, (२६ डिसेंबर २०२५) ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आमदार सतेज पाटील यांच्या सहीनिशी उमेदवारांची यादी प्रसिद्धीस दिली आहे. ४८ मध्ये सोळा माजी नगरसेवकांचा समावेश आहे. तर चौदा उमेदवार हे माजी नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. ४८ उमेदवारापैकी तीस उमेदवार हे माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुंबांतील सदस्य आहेत.
प्रभाग क्रमाांक दोनमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गमधून आरती दिपक शेळके, प्रभाग क्रमांक तीनमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गमधून माजी उपमहापौर प्रकाश शंकरराव पाटील, प्रभाग क्रमांक तीनमधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून किरण स्वप्निल तहसीलदार, प्रभाग क्रमांक चारमधून अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून स्वाती सचिन कांबळे, नागरिकांचा मागास प्रवर्गातून विशाल शिवाजी चव्हाण, महिला सर्वसाधारण प्रवर्गातून दिपाली राजेश घाटगे तर सर्वसाधारणमधून स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक पाच मधून सर्वसाधारण गटातून माजी उपमहापौर अर्जुन माने यांची उमेदवारी घोषित झाली. प्रभाग क्रमांक सहामधून अनुसूचित जाती प्रवर्गातून रजनीकांत जयसिंह सरनाईक, सर्वसाधारण महिला गटातून तनिष्का धनंजय सावंत, सर्वसाधारण गटात माजी नगरसेवक प्रतापसिंह दत्तात्रय जाधव हे उमेदवार आहेत.
प्रभाग क्रमांक सातमधून सर्वसाधारण महिला गटातून माजी नगरसेविका उमा शिवानंद बनछोडे या उमेदवार आहेत.प्रभाग क्रमांक आठ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून अक्षता अविनाश पाटील, सर्वसाधारण महिला गटातून ऋग्वेदा राहूल माने, सर्वसाधारण गटातून प्रशांत महादेव खेडकर व माजी नगरसेवक इंद्रजीत पंडितराव बोंद्रे यांची उमेदवारी आहे. प्रभाग क्रमांक नऊमधून सर्वसाधारण महिला गटातून पल्लवी सोमनाथ बोळाईकर व विद्या सुनिल देसाई, सर्वसाधारण गटातून माजी नगरसेवक राहुल शिवाजीराव माने यांची उमेदवारी आहे. प्रभाग क्रमांक दहामधून सर्वसाधारण महिला गटातून माजी नगरसेविका दीपा दिलीपराव मगदूम यांची उमेदवारी आहे. प्रभाग क्रमांक ११ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग गटात माजी नगरसेविका जयश्री सचिन चव्हाण उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक बारामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गमधून रियाज अहमद सुभेदार, सर्वसाधारण महिला गटातून स्वालिया साहिल बागवान व अनुराधा अभिमन्यू मुळीक तर सर्वसाधारण गटातून माजी नगरसेवक ईश्वर शांतीलाल परमार हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक तेरामध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून पूजा भूपाल शेटे, सर्वसाधारण गटातून प्रवीण हरिदास सोनवणे यांची उमेदवारी घोषित केली. प्रभाग क्रमांक चौदामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला, सर्वसाधारण गटातून अमर प्रणव समर्थ व माजी नगरसेवक विनायक विलासराव फाळके यांच्या नावाची घोषणा झाली.
प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सर्वसाधारण महिला गटातून अश्विनी अनिल कदम, सर्वसाधारणमधून माजी उपमहापौर संजय वसंतराव मोहिते यांना उमेदवारी दिली प्रभाग क्रमांक सोळामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गमधून उमेश देवाप्पा पोवार, सर्वसाधारण गटातून भैया वसंतराव शेटके यांची उमेदवारी आहे. प्रभाग क्रमांक सतरामध्ये अनुसूचित जाती महिला गटातून अर्चना संदीप बिरंजे, सर्वसाधारण महिला गटातून शुभांगी शशिकांत पाटील, सर्वसाधारण गटातून माजी नगरसेवक प्रविण लक्ष्मणराव केसरकर यांची उमेदवारी आहे.प्रभाग क्रमांक १८ मध्ये अनुसूचित जाती महिला गटातून अरुणा विशाल गवळी, सर्वसाधारण गटातून माजी नगरसेवक भूपाल महिपती शेटे व सर्जेराव शामराव साळुंखे यांची उमेदवारी घोषित केली.प्रभाग क्रमांक १९ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून दुर्वास परशुराम कदम, सर्वसाधारण महिला गटातून सुषमा संतोष जरग, सर्वसाधारण गटातून माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांना उमेदवारी जाहीर झाली. प्रभाग क्रमांक वीसमध्ये अनुसूचित जाती महिला गटातून जयश्री धनाजी कांबळे, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून उत्कर्षा आकाश शिंदे, नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून धीरज भिवा पाटील, सर्वसाधारण महिला गटातून मयुरी इंद्रजीत बोंद्रे तर सर्वसाधारण गटातून माजी नगरसेवक राजू आनंदराव दिंडोर्ले यांची उमेदवारी घोषित झाली.