शिवनेरीनगर मित्र मंडळतर्फे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा
schedule01 Apr 26 person by visibility 5 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवनेरीनगर मित्र मंडळ, पाचगांवतर्फे एक एप्रिल ते चार एप्रिल २०२६ या कालावधीत श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा आयोजित केला आहे. एक एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता, नगर प्रदक्षिणा आहे. दोन एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता, रुद्र अभिषेक, सकाळी ६.२९ वाजता जन्मोत्सव सोहळा, अकरा वाजता रक्तदान शिबिर होत आहे. सायंकाळी पाच वाजता, भैरवी महिला भजनी मंडळ शांतीनगर, सद्गुरु भजनी मंडळ कंदलगावचा कार्यक्रम आहे. तीन एप्रिल रोजी, सकाळी नऊ वाजता, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ मोहिते कॉलनी कार्यक्रम आहे. याचदिवशी, दुपारी बारा वाजता महाप्रसाद आयोजित केला आहे. रात्री आठ वाजता श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक भजनी मंडळाचा कार्यक्रम आहे. चार एप्रिल रोजी रात्री आठ वाजता सलाम महाराष्ट्र हा सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. अशी माहिती संयोजक नारायण गाडगीळ, गणपती हसनकर, सुभाष होसमनी यांनी दिली आहे.