Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण तततमाध्यमिक शिक्षण विभागाची मोठी कामगिरी; अतिरिक्त शिक्षक - कर्मचाऱ्यांचे समायोजन यशस्वीरित्या पूर्णघघ मयमपरिते ग्रामस्थांचा मोर्चा श्रीराम साळुंखे यांना पीएचडीमाध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त गोंधळ ; समायोजन प्रक्रियेस कासवगती         प्राथमिक दूध संस्थांच्या न्यायासाठी गोकुळच्या संचालकांनी ठोकला शडडूजिल्हा परिषदेची सत्ता लाडक्या बहिणींच्या हाती ! सहापैकी पाच पदावर महिला !!-शिक्षक पात्रता परीक्षा एकवीस जूनला, आवेदनपत्र भरण्याची मुदत सोळा एप्रिलपर्यंतआयटी. पार्कच्या जागा हस्तांतरणाचा मार्ग सुकर, औद्योगिक विकास महामंडळाने भरले ५ कोटी ६० लाख

जाहिरात

 

माध्यमिक शिक्षण विभागाची मोठी कामगिरी; अतिरिक्त शिक्षक - कर्मचाऱ्यांचे समायोजन यशस्वीरित्या पूर्ण

schedule31 Mar 26 person by visibility 36 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेत कोल्हापूर शिक्षण विभागाने प्रभावी कामगिरी करत अतिरिक्त् शिक्षक व कर्मचाऱ्यांचे समायोजन यशस्वीरित्या पूर्ण केले. २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार, जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटल्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे.
समायोजन प्रक्रियेत शिक्षकांच्या एकूण ४७ अतिरिक्त शिक्षकांपैकी ३२ शिक्षकांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्यात आले, तर उर्वरित १५ शिक्षकांचे त्यांच्याच मूळ संस्थेत (संस्थांतर्गत) समायोजन झाले. शिक्षकेतर कर्मचारीमध्य वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल अशा एकूण १९ कर्मचाऱ्यांपैकी १२ जणांचे समायोजन पूर्ण झाले असून, उर्वरित ७ जणांचे संस्थांतर्गत समायोजन केले.
  शिपाई संवर्ग: अतिरिक्त ठरलेल्या १९ शिपायांचे समायोजन वरिष्ठ कार्यालयाकडील सूचननेुसार पूर्ण केले जाणार आहे.
जिल्ह्यातील ११ शाळा विद्यार्थी अभावी ‘शून्य शिक्षक’ स्थितीत गेल्या आहेत. या शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही समायोजन केले आहे. संबंधित शिक्षकांनी त्यांच्या मूळ शाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा व शालेय दप्तराचे रितसर हस्तांतरण करून १५ जूनपर्यंत नवीन शाळेत हजर राहण्याच्या सूचना आहेत. इतर सर्व कर्मचाऱ्यांनी सात दिवसांच्या आत आपल्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे अनिवार्य आहे.या प्रक्रियेसाठी अधिकृत आदेश पारित करण्यात आले. या समुपदेशन प्रक्रियेवेळी जिल्ह्यातील विविध माध्यमिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रक्रियेसंबंधी पारदर्शकता आणि प्रभावी नियोजनाबद्दल शिक्षक संघटनांच्यावतीने शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes