+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे.
Screenshot_20240226_195247~2
schedule14 Mar 24 person by visibility 110 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
बलाढ्य शिवाजी तरुण मंडळांनै सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शिवाजीने बालगोपाल तालीम मंडळाचा २-० असा पराभव केला. पाटाकडील तालीम मंडळाने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
शिवाजी आणि बालगोपाल यांच्यातील उपांत्य सामना पाहण्यासाठी शाहू स्टेडियमवर फुटबॉल शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. सामन्याच्या नवव्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाच्या संकेत नितीन साळोखे याने बालगोपालची बचाव फळी भेदत मैदानी गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परतफेड करण्यासाठी बालगोपालने वेगवान चढाया केल्या. मणीकंडम मुरुगन, अक्षय मंडलिक, रोहित कुरणे, यशराज कांबळे यांच्या चढाया चांगल्या झाल्या.
 मध्यंतरास शिवाजी संघ १-० असा आघाडीवर होता. उत्तरार्धात परतफेड करण्यासाठी बालगोपालने वेगवान चढाया केल्या .पण शिवाजी तरुण मंडळाने भक्कम बचाव घेत ठेवत प्रतीचढाया करत बालगोपालवर दबाव कायम ठेवला. करण चव्हाण बंदरे ,संकेत साळोखे, योगेश कदम यांनी खोलवर चढाया केल्या . ७५ व्या मिनिटाला करण चव्हाण बंदरेने चेंडूवर नियंत्रण मिळवत बचाव फळीतील खेळाडूंना चकवत उत्कृष्ट मैदानी गोष्टी गोलची नोंद केली. बालगोपालच्या अक्षय सरनाईकने गोल नोंदवण्याची सोपी संधी गमावली तर मणीकंडम मुरुगन याचा हेड गोलपोस्ट जवळून गेला.पूर्ण वेळेत २-० आघाडी कायम टिकवून शिवाजीने सामना जिंकून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले.
 शिवाजीकडून संदेश कासार एडविन, संकेत साळोखे, सिद्धेश साळोखे, योगेश कदम तर बालगोपालकडून अक्षय मंडलिक, आकाश मोरे, रोहित कुरणे, आशिष कुरणे, प्रतीक पवार, मिथाई यांचा चांगला खेळ झाला. शिवाजीचा खेळाडू संकेत निखिल कोराने साळोखे याची सामनावीर तर बालगोपालच्या मिथाई याची लढवय्या खेळाडू म्हणून निवड झाली.
 शुक्रवारचा उपांत्य सामना, पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ दुपारी चार वाजता.