कोल्हापूरचा स्वाभिमान राखण्यासाठी समविचारी आघाडीला विजयी करा - सतेज पाटील
schedule13 Oct 26 person by visibility 25 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘गोकुळचा निर्णय मुंबईतून होत असेल तर या जिल्ह्यातील शेतकरी, दुधउत्पादक आणि ठरावधारक कधीच मान्य करणार नाहीत. कोल्हापूरचा स्वाभिमानी राखण्यासाठी येत्या १८ ऑक्ठोबरला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी“शिट्टी” या चिन्हासमोर शिक्का मारून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे सर्व २५ उमेदवार निवडून देतील. ’असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हातकणंगले तालुक्यातील ठरावधारकांच्या मेळावा झाला. या प्रसंगी ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, ‘ शेतकरी जो ताठ मानेने उभा आहे. तो सहकारच्या प्रगतीवर त्याने केलेल्या कष्टावर. स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांनी उभा केलेला गोकुळ कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे, राजीव किसनराव आवळे, विश्वासराव इंगवले, सौरभ राजू शेट्टी, रामराजे कुपेकर, धनाजीराव नाईक, भगवानराव जाधव, धनाजी करवते, उत्तम सावंत, बबनराव पाटील, राहुल सातपुते, महेश कुंभार, भारत पाटील, सभापती आक्काताई पाटील, उपसभापती प्रवीण जनगोंडा, अभिजीत माने, शकील अत्तार, चेतन चव्हाण यांच्यासह समविचारी आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.