Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात शनिवारी - रविवारी कंदमुळांचा महोत्सवसतेज पाटलांशी हातमिळवणी ही तर अफवाच, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष महायुतीचाच - हसन मुश्रीफ एकनिष्ठेचे फळ ! गोल्डनमॅनच्या चिरंजीवला मिळाली सभापतिपदाची संधी ! !गोकुळमधील बोगस सभासदांना दिलासा नाही-प्रकाश बेलवाडेंची माहितीपरिवहन समितीच्या सभापतिपदी सत्यजीत जाधव ! निवडीवर काँग्रेसचा आक्षेप !!कोल्हापुरात चौदा मार्चपासून पाच दिवसीय ताराराणी महोत्सवतावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंतच्या उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावीब्राह्मण समाजाच्या प्रश्नांवर सरकारचे दुर्लक्ष, सर्वपक्षीय आमदार - खासदारांना भेटणारकोल्हापुरात चौदा मार्चला फार्मा करंडक, चौदा फार्मसी महाविद्यालयांचा सहभागस्थायी समितीत महायुतीचा जय हो, सभापतीपदी भाजपचे विशाल शिराळे!

जाहिरात

 

शहीद महाविद्यालयाची विद्यार्थिनी इंग्रेडिएंट हंटिंग स्पर्धेत प्रथम

schedule10 Feb 25 person by visibility 415 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : संजय घोडावत युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित सायन्स स्टार  2025 जिल्हास्तरीय  स्पर्धेत शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या होम सायन्स विभागातील विद्यार्थिनी ज्योती एकनाथ थोरवत हिने उल्लेखनीय यश मिळवले आहे "इंग्रेडिएंट हंटिंग" या स्पर्धेत तिने आपल्या कौशल्यपूर्ण निरीक्षण आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या  उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. मात्र, ज्योती थोरवत हिने आपल्या अचूक निरीक्षणशक्तीच्या जोरावर स्पर्धकांवर मात करत प्रथम क्रमांक मिळवला.या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर आणि शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांनी तिचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी तिला प्रा. गायत्री पाटील, प्रा. सिद्धार्थ चव्हाण आणि प्रा. पुनम शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes