ग्रीन कॉलेज - क्लीन कॉलेज स्पर्धेत शहीद महाविद्यालयाचा तृतीय क्रमांक
schedule12 Feb 25 person by visibility 255 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित ग्रीन कॉलेज क्लीन कॉलेज स्पर्धेत शहीद महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. किर्लोस्कर वसुंधरा इको रेंजर्स इनिशिएटिव्ह अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सायबर कॉलेज कोल्हापूर येथे झाली. स्पर्धेत महाविद्यालयाने स्वच्छता मोहिम, हरित उपक्रम, प्लास्टिकमुक्त परिसर आणि वृक्षारोपणासारख्या उपक्रमांवर भर दिला.पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. मधुरा पाटील, मृदुला पाटील आणि टीम यांनी प्रभावी सादरीकरण केले. त्यामध्ये महाविद्यालयात राबवलेल्या स्वच्छता मोहिमांची माहिती, पर्यावरणपूरक उपक्रम, आणि भविष्यातील संकल्पनांचे विवरण करण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर, शिक्षक आणि विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त केला.