शां.कृ. पंत वालावलकर हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव दिमाखात
schedule28 Nov 25 person by visibility 10 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : मुक्त सैनिक विद्यापीठ अंतर्गत व आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित शां.कृ. पंत वालावलकर हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ दिमाखात झाला. कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धेचे उद्दघाटन झाले. मैदानाचे पूजन कोल्हापूर मार्केट कमिटी संचालक कुमार आहुजा यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते महेश वारके यांच्या हस्ते आकाशात शाळेच्या नामफलकासह फुगे सोडण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरभारती शिक्षण मंडळाचे सचिव एम एस पाटोळे होते. मुख्याध्यापिका व्ही.व्ही. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राष्ट्रगीत, संविधान गीत सादर करण्यात आले. मुला - मुलींनी झांजपथक व संगिताच्या तालावर क्रीडा नृत्य सादर केले. त्यांना मार्गदर्शन क्रीडाशिक्षक डॉ. राजेंद्र बनसोडे व रणजित माने यांनी केले. संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानातील मुलभूत हक्क व कर्तव्ये याची माहिती शिक्षक प्रतिनिधी अनिल चव्हाण यांनी सांगितली. संविधान शपथ इंद्रायणी पाटील यांनी दिली. यावेळी संविधान प्रचार फेरी काढण्यात आली. आंतरभारतीचे संचालक हसन देसाई, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. व्ही.व्ही. कुलकर्णी, उपमुख्याध्यापक आर. पी. मोरे, पर्यवेक्षक राजेश वरक, उपस्थित होते. सिद्धी कपिलेश्वरी व पल्लवी यादव यांनी सूत्रंचालन केले. समीर जमादार यांनी आभार मानले