Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीयई-चलन संदर्भातील मागण्यांवर सरकार सकारात्मक, वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी कार्यवाही - प्रताप सरनाईकउल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कारहद्दवाढीवरुन महापालिका सभा तहकूब, गांधीनगरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृह आक्रमक चारचाकी वाहन सारले बाजूला…नगरसेवक सवार झाले इलेक्ट्रिक बाईक, सायकलवर !कृष्णराज महाडिक यांचा बार्शी - सोलापूर एसटी प्रवास

जाहिरात

 

सेवक संघाचे ठिय्या आंदोलन, प्रशासनाने घेतला पदोन्नतीचा निर्णय

schedule10 Apr 26 person by visibility 619 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विविध संवर्गातील पदोन्नती मिळाव्यात यासाठी शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या नेतृत्वाखाली, शुक्रवारी ( दहा एप्रिल २०२६) ठिय्या आंदोलन करण्यात आले. सेवक संघाचा नारा देत कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. तसेच कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव शिंदे, संबंधित विभागाच्या अधिकारी विभा अंत्रेडी आणि सेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा झाली. याप्रसंगी प्रकुलगुरू जाधव व कुलसचिव शिंदे यांनी, ‘प्रशासनाकडून पदोन्नतीचा विषय मार्गी लावू’अशी ग्वाही सेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार त्यांनी पदोन्नतीचे आदेश काढण्याचे आदेश दिले. काही पदोन्नतीचे आदेश हे सोमवारी काढण्यात येणार आहेत.

प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्यामुळे सकाळपासून सुरू असलेले आंदोलन दुपारी थांबले. दरम्यान कोणतीही पूर्वसूचना न देता सुरू करण्यात आलेल्या आंदोलनामुळे कामानिमित्त विद्यापीठात आलेल्यांना काही तास तिष्ठत थांबावे लागले. दुसरीकडे विद्यापीठातील उपकुलसचिव, सहायक कुलसचिव, अधीक्षक, सहायक अधीक्षक वरिष्ठ लेखनिक, लेखनिकांच्या पदोन्नतीचा विषय रखडला होता. पदोन्नती लवकर मिळाव्यात यासाठी संघटनांचा पाठपुरावा सुरू होता.

  शुक्रवारी, विद्यापीठातील कर्मचारी एकवटले आणि त्यांनी पदोन्नतीचा विषय घेत आंदोलन सुरू केले. सेवक संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले, सतीश कुसुंबे, चंद्रशेखर कदम, शरद तळेकर, विकास मोहिते, धैर्यशील यादव, सचिन नाळे, अनिल साळोखे, अनिल गायकवाड, अरुण वणिरे,सुरेश पाटील, प्रशांत पाटणे, शैलेंद्र कोळी, प्रसाद देसाई, विशाल हिलगे, प्रसाद जाधव, गणेश जाधव, दिपक चव्हाण, प्रमोद शिंदे, संजय पोवार, मनोज कुंटे, सुभाष संकपाळ, वैशाली कोकाटे, शितल सरनाईक, अभिजीत  लिंग्रज, अभिजीत रेडेकर, अजित इंगळे,  यांच्यासह अनेक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले. प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी केल्यावर सगळया कर्मचाऱ्यांनी कुलसचिवांच्या दालनाबाहेर ठिय्या मारला. कुलसचिव हे विद्यापीठाच्या कामानिमित्त कार्यालयाबाहेर होते. यामुळे कर्मचाऱ्यांनी दालनाबाहेर ठिय्या मारला. कुलसचिव शिंदे कार्यालयात आल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली.  प्रकुलगुरू जाधव यांच्या दालनात कुलसचिव शिंदे, अधिकारी अंत्रेडी व सेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत सेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी निगडीत विषयांची मांडणी केली. पदोन्नतीचा आग्रह धरला. चर्चेअंती प्रशासनाने, पदोन्नतीचे आदेश दिल्यामुळे सेवक संघाने आंदोलन मागे घेतले.

……………………………

“ विविध पदावरील पदोन्नती लवकर द्याव्यात यासाठी गेले काही दिवस पाठपुरावा सुरू होता. एखादा अधिकारी किंवा कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर तत्काळ त्या ठिकाणी सरकारी व विद्यापीठीय नियमानुसार पदोन्नती द्यावी ही आमची भूमिका आहे. यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही. शुक्रवारी सगळे कर्मचारी एकवटले, सेवक संघाच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. कर्मचाऱ्यांच्या भावना विचारात घेत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत पदोन्नतीचे आदेश काढण्याची ग्वाही दिली. आंदोलनाला यश मिळाले.”

- मिलिंद भोसले, अध्यक्ष शिवाजी विद्यापीठ सेवक संघ

………………………………………

प्रशासनाची सहकार्याची भूमिका, प्रकुलगुरू, कुलसचिवांची दोन तास चर्चा

विद्यापीठीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसंबंधी गेले अनेक दिवस पाठपुरावा सुरू होता. शुक्रवारी, कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत चर्चा केली. प्रकुलगुरू ज्योती जाधव यांनी पुढाकार घेतला. प्रकुलगुरू जाधव, कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांनी जवळपास दोन तास सेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सगळया बाबी विचारात घेत पदोन्नतीचे आदेश दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes